प्रकृती बिघडल्याने रजनीकांत रुग्णालयात दाखल

    दिनांक :25-Dec-2020
|
हैदराबाद, 
दक्षिण चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांची प्रकृती अचानक बिघडली असून, त्यांना येथील अपोलो या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या रक्तदाबात चढ-उतार होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
 

rajanikant_1  H 
 
रजनीकांत यांच्या ‘अन्नाथे’ चित्रपटाचे चित्रीकरण अलीकडेच रोखण्यात आले होते. या चित्रपटाच्या सेटवरील सहा सदस्य कोरोना संक्रमित असल्याचे आढळले होते. यानंतर रजनीकांत यांनी स्वत:ला चेन्नईतील आपल्या फार्महाऊसमध्ये विलग केले होते. महत्त्वाचे म्हणजे, रजनीकांत 31 डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.
 
 
कोरोनाच्या पृष्ठभूमीवर जारी करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे ‘अन्नाथे’चे चित्रीकरण नऊ महिन्यांसाठी थांबविण्यात आले होते. नंतर 14 डिसेंबरपासून हैदराबादमधील रामोजी फिल्म सिटीमध्ये चित्रीकरणाला पुन्हा सुरुवात झाली, पण सहा सदस्य कोरोनाबाधित निघाल्याने चित्रीकरण थांबविण्यात आले.