यवतमाळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची कामगिरी
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नुकतीच एक जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये महिलेच्या पोटातून तब्बल आठ किलो वजनाचा गोळा यशस्वीरित्या काढण्यात आला.
कळंब येथील एक महिला पोटाच्या आजाराने ग्रासलेली होती व ती मेडिकलमध्ये शल्यचिकित्सा विभागातील पथक क्रमंक ३ मध्ये भरती झाली. तपासण्यांमध्ये तिच्या पोटात मोठा गोळा (ओव्हेरिअन सिस्ट्याडीनोमा) असल्याचे निष्पन्न झाले. पथक प्रमुख शल्य चिकित्सक डॉ. विजय पोटे यांनी या रुग्णावर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून आठ किलोंचा गोळा यशस्वीरित्या काढला.
या शस्त्रक्रियेमधे डॉ. राजू गोरे, डॉ. दीपक ठाकूर, डॉ. कपिलेश, डॉ. कृष्णा किरकिरे, डॉ. अमोल आगलावे, डॉ. साईलक्ष्मी बानोत, डॉ. प्रियांका साळुंके, डॉ. ओमकार कवितके, डॉ. बालाजी श्रीराम, डॉ. मनीष शर्मा, डॉ. रुची शर्मा यांचे सहकार्य लाभले.
बधीरीकरणाची जबाबदारी डॉ. रोशन शेंडे, डॉ. विनय धकाते, डॉ. भूषण अंबारे, डॉ. सुमेध गुर्डे, डॉ. प्रियांका गेडाम, डॉ. अंजली नाकोडे, डॉ. पल्लवी पंढारी, डॉ. अqजक्य वानरे, डॉ. पंकज करांडे यांनी निभावली. तसेच परिचारिका रजनी बोमले, वंदना जमनारे, नंदा दयालवार, कल्पना ठोंबरे, छाया मोरे, प्रतीक्षा दातीर, परिचारक निखिल तायडे तसेच सेवक उमेश हांडे व रणजित कनोजिया यांनी मदत केली.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिqलद कांबळे, शल्यचिकित्सा विभागप्रमुख डॉ. गिरीश जतकर, बधिरीकरणशास्त्र विभागप्रमुख डॉ. दामोदर पटवर्धन व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार यांनी शस्त्रक्रिया करणाèयांचे अभिनंदन केले व डॉक्टरांच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला.