हिंगणघाट जळीतकांड: आरोपी विकेश नगराळेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल

    दिनांक :11-Feb-2020
वर्धा,
हिंगणघाट येथे पेट्रोल टाकून जाळलेल्या पीडित प्राध्यापक तरुणीची काल सोमवारी प्राणज्योत मावळली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात 302 या कलमाची वाढ केली आहे. घटनेप्रकरणी आरोपी विकेश नगराळे याच्यावर सुरवातीला कलम 307, 326 (a) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर यामध्ये 302 या कलमाची वाढ करण्यात आली आहे. प्रकरणाचा लवकर तपास करून प्रकरणात चार्जशीट दाखल करण्यात  येणार आहे. 


vikki nagrale 1_1 &n
हिंगणघाट जळीत हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल. अशा घटनेच्या तपासात कुचाराई होऊ दिली जाणार नाही. पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा रितीने चालविण्यात येईल. त्यासाठी अॅड. निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.