धक्कादायक! अतिक्रमण हटविले म्हणून पोलिसाच्या घराला लावली आग

    दिनांक :12-Feb-2020
कोल्हापूर,
अतिक्रमण काढल्याच्या रागातून काही समाजकंटकांनी पोलीस निरीक्षकाचे घर पेटविल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर येथे समोर आली आहे. संजय पतंगे असे घर पेटविण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गारगोटी येथील पोलीस लाइन्स परिसरात घडली ही घटना घडली आहे. जमावाने पतंगे यांची खासगी गाडीही पेटवून दिली. या घटनेनंतर गारगोटी परिसरात खळबळ उडाली असून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
 
kolhapur fire _1 &nb
 
मंगळवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. या प्रकरणातील संशयित सुभाष देसाई याला ताब्यात घेतल्याचे अपर पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे यांनी सांगितले. भुदरगड पोलीस कर्मचारी निवासस्थानाच्या आवारात सुभाष देसाई याने अतिक्रमण करून दुकानाचा गाळा काढला होता. हे अतिक्रमण संजय पतंगे यांनी काढले होते. त्याचा राग आल्याने संशयित सुभाष देसाई याने  वसाहतीतील कर्मचाऱ्यांना धमकी दिली होती. त्यानं रॉकेलचा कॅनही आणून ठेवला होता. मंगळवारी रात्री त्यानं पोलीस कर्मचारी वसाहतीत राहणारे पोलीस निरीक्षक पतंगे यांच्या मोटारीवर रॉकेल ओतून ती पेटवून दिली. त्यात ती जळून खाक झाली. त्यानंतर पतंगे यांच्या घरावरही रॉकेल ओतून ते पेटवून दिले. आगीमुळे घराच्या हॉलच्या काचा फुटल्या. आतील फर्निचरला आग लागून मोठे नुकसान झाले.