कोरोना : हुबेईत एकाच दिवसात 242 बळी

    दिनांक :13-Feb-2020
बीजिंग,
कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे चीनमधील हुबेई प्रांतात गुरुवारी 242 रुग्णांचा बळी गेल्याची माहिती आहे. या धोकादायक विषाणूची आणखी 15 हजारांहून अधिक नवीन रुग्णांना लागण झाली आहे, असे वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांनी सांगितले. हुबेईच्या आरोग्य आयोगाने नवीन आकडेवारी जाहीर केल्यावर आतापर्यंत कमीतकमी 1,355 लोक देशभरात मरण पावले आहेत आणि जवळजवळ 60 हजार लोकांना विषाणूची लागण झाली आहे. आपल्या दैनंदिन अद्यतनात
 

corona_1  H x W 
 
 
हुबेईच्या आरोग्य आयोगाने मध्य प्रांतात आणखी 14,840 नवीन प्रकरणांना दुजोरा दिला आहे. येथे डिसेंबर महिन्यात पहिला रुग्ण आढळला होता. नवीन निकषांनुसार मानक न्यूक्लिक चाचण्यांऐवजी संशयित प्रकरणांत फुफ्फुसातील इमेिंजग चाचणी विषाणूचे निदान करण्यासाठी पुरेशी मानली जाऊ शकते. नवीन कोरोना विषाणूमुळे न्युमोनियाबद्दलचा आमचा समज बदलला आहे. त्यामुळे निदान व उपचारात सातत्याने नवीन अनुभव आम्ही घेत आहोत, असही आरोग्य अधिकार्‍यांनी सांगितले.