भारत दौर्‍यासाठी मेलानिया ट्रम्प उत्सुक

    दिनांक :13-Feb-2020
वॉशिंग्टन,
राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत भारतदौर्‍यावर येण्यास आपण उत्सुक आहोत, असे ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांनी टि्‌वटच्या माध्यमातून म्हटले आहे. या महिन्याच्या अखेरीस ट्रम्प भारतदौर्‍यावर येणार आहेत. आपला हा पहिलाच भारत दौरा असून दोन्ही देशांमधील प्रगाढ संबंध साजरा करण्याचा हा सुयोग्य प्रसंग आहे, असेही मेलानिया यांनी नमूद केले.
 

trump _1  H x W 
 
भारतदौर्‍यासाठी आग्रहपूर्वक निमंत्रण दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभारही मानले. मेलानिया ट्रम्प मोदींच्या टि्‌वटवर प्रतिक्रिया देत होत्या. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प आणि ‘प्रथम महिला’ मेलानिया यांच्या प्रस्तावित भारत दौर्‍याला मोदींनी ‘अतिशय खास’ म्हणून संबोधले आहे. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प 24 आणि 25 फेब्रुवारीला भारतदौर्‍यावर येणार आहेत.