रुग्णावर बलात्कार करणाऱ्या मानसोपचार तज्ञाला अटक

    दिनांक :13-Feb-2020
मुंबई,
उपचार घेण्यासाठी आलेल्या एका रुग्णावर मानसोपचार तज्ज्ञाने दोन वर्षांपूर्वी बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या मानसोपचार तज्ज्ञाविरोधात कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात अनैसर्गिक संबंध ठेवल्याचा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची रवानगी कोठडीत  करण्यात आली आहे.
 
doctor arrested_1 &n
 
संजोय मुकेरजी असे या मानसोपचार तज्ज्ञाचे नाव आहे. २०१८मध्ये एका तरुणीवर बलात्कार करण्यात आला होता. मात्र, या तरुणीने तिच्या पालकांना या आठवड्यात त्याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. २०१८मध्ये ही तरुणी मानसिक आजाराने त्रस्त होती. तिला भीतीने ग्रासले होते. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी तिला डॉक्टरकडे नेले असता त्यांनी तिला रक्तचाचणी करण्यास सांगितले. रक्ताचे रिपोर्ट नॉर्मल आल्यानंतर तिला मानसिक त्रास असल्याचे सांगून डॉक्टरांनी तिला मानसोपचार तज्ज्ञांकडे नेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ही तरुणी मुकेरजींच्या दवाखाना गेली. मात्र नराधम डॉक्टरने तरुणीवर बलात्कार केला व त्याची चित्रफीत काढली  त्यानंतर या तरुणीने मुकेरजीकडे पुन्हा जाऊन ती चित्रफीत डिलिट करण्यास सांगितले असता त्याने पुन्हा तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर परत मुकेरजीकडे गेली नाही. तिने एका महिला मानसोपचार तज्ज्ञाकडे उपचार सुरू केले. उपचार सुरू असताना या तरुणीने झालेला सर्व प्रकार महिला मानसोपचार तज्ज्ञाला सांगितला. त्यावर तिने या तरुणीला सर्व प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगण्यास सांगितले आणि त्यानंतर ११ फेब्रुवारी रोजी मुकेरजीला अटक करण्यात आली. लॅबमध्ये मुकेरजीच्या फोनची तपासणी होणार आहे. ही तरुणी आपल्याला आवडत असल्याचे मुकेरजीने पोलीस तपासात सांगितल्याचे समोर आले आहे.