उत्तरप्रदेशात भीषण अपघात, 14 मृत

    दिनांक :13-Feb-2020
-खाजगी बसची रस्त्यात उभ्या ट्रकला जोरदार धडक
लखनौ,
उत्तर प्रदेशातील फिरोझाबाद जिल्ह्यात आग्रा-लखनौ एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून, 25 पेक्षा अधिक जखमी झाले. रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला खाजगी बसने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतकांत बिहारमधील अधिक प्रवाशांचा समावेश असल्याचे समजते.
 

firozabad_1  H  
 
 
माहितीनुसार, दिल्लीहून मोतिहारीला (बिहार) जाणार्‍या खाजगी व्होल्वो बसने महामार्गावरील नगला खगर भागात रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला मागाहून जोरदार धडक दिली. प्रत्यक्षदर्शींनुसार सदर व्होल्वो बस फिरोझाबादमधील भदान गावाजवळ पोहोचताच चालकाचा ताबा सुटल्याने ती ट्रकवर वेगाने आदळली. ही धडक जोराची असल्याने बसचा चक्काचूर झाला. त्यामुळे मृतकांचा आकडा वाढला आहे.
 
 
धडकेत बसचे मोठे नुकसान झाले असून, तिला ट्रकपासून क्रेनद्वारे अलग करावे लागले. बसमधील प्रवाशी जागीच फ सून राहिल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी अधिक वेळ लागला. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळाली आहे.