बापाने केला पोटच्या मुलीचा विनयभंग

    दिनांक :13-Feb-2020
हिंगणघाट,
शहरात एकतर्फी प्रेम प्रकरणातून एका प्राध्यापिकेला जाळुन मारण्याच्या प्रकारणाची धग कायम असतांनाच शहरात एका नराधम पित्याने स्वतः च्या अल्पवयीन लेकिचाच विनयभंग केल्याची तक्रार खुद्द मुलीनेच हिंगणघाट पोलिसांत केली आहे.
तीन बायकांच्या दादला असलेल्या या पित्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याचेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
सदर प्रकार शहरातील सावित्रीबाई फुले कन्या वसतिगृह येथे घडला असून आरोपी पिता आपल्या शिक्षणाकरिता येथे वास्तव्यास असलेल्या १३ वर्षीय मुलीची भेट घेण्याकरीता आला असता हा घृणास्पद प्रकार केला.
 

hinganghat sexual harashm 
 
आरोपी पिता हा पत्नी व कुटुंबियापासून विभक्त झाला असून सध्या तो मध्यप्रदेशातील जबलपुर येथे वास्तव्यास आहे.
काही वर्ष्यापूर्वी पीड़िता तिच्या आईसह जबलपुर येथे राहायची, परंतु नंतर तीची आई सोडून गेल्यामुळे रालेगांव(यवतमाळ)
तालुक्यातील कोपरी येथे राहत होती. शिक्षणाकरीता ती हिंगणघाट येथे वस्तीगृहात राहत होती. मंगळवारी सायंकाळी तो मुलीस भेटण्याकरीता वस्तीगृहात गेला, तीला वसतिगृहातुन बाहेर बोलावून कामांध नजरेने तिच्याशी छेड़छाड़ करु लागलाअसता ती तेथून ताबड़तोब वासतिगृहात आली. तीने नकार दिल्याने प्रवेशद्वाराजवळच तिला अर्वाच्च शिविगाळ करीत विनयभंग केला.
तिने आपल्या वार्डनकड़े याची माहिती दिली, त्यानंतर वार्डन चे मदतीने तिने पोलिस तक्रार केली. काल त्याला पोलिसांनी राळेगांव तालुक्यातील कोपरी येथून पोलिसांनी ताब्यात घेवून जेरबंद केले.पोलिसांनी भादवी ३५४ अ व पोस्कोनुसार गुन्हा दाखल केला असून आरोपीला न्यायालयीन पोलिस कोठड़ी सुनावन्यात आली आहे. पुढील तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.