रिसोड येथील अवैध सावकारावर धाडी

    दिनांक :13-Feb-2020
खरेदी खत व दस्तऐवज तपासणीसाठी घेतले ताब्यात
 
रिसोड,
जिल्हाधिकारी वाशीम व जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशीम यांचे मार्गदर्शनाखाली रिसोड तालुक्यामधील अवैध सावकार, विनोद रमणलाल चरखा, रमेश किसन इंगोले व किसन तुकाराम इंगोले मु.सिरसाळा, कुलभुषण नेमीनाथ शेंडे रा. हराळ, अमोल माधव मगर रा. हराळ यांचे दुकान,निवासस्थानावर चार पथकामार्फत टाकलेल्या धाडीमध्ये अवैध सावकारी बाबत पुढील चौकशीसाठी दस्तऐवज, खरेदीखत जप्त करण्यांत आले.


savkari_1  H x

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था वाशीम यांचे मार्गदर्शनाखाली वाशीम जिल्ह्यातील अवैध सावकारावर करावयाच्या कारवाई नुसार रिसोड तालुका व शहरामधील अवैध सावकारावर चार पथकांनी झडती घेतली. पथकामध्ये सहकार विभागाचे वीस अधिकारी व कर्मचारी समाविष्ट होते. 13 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळी 8ते 9 चे सुमारास धाडी टाकण्यात आल्या. सदर कारवाईमध्ये रिसोड पोलीस स्टेशनचे आठ पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. सहाय्यक निबंधक एम. बी. बनसोडे, यांचे नेतृत्वात एन. डी. धार्मिक, एस. व्ही. राठोड व बी. बी. मोरे, पी. टी. सरकटे, एन. आर. गरकळ व भारती इंगळे, पी. आर. वाडेकर, संदीप गादेकर, राम देशमुख, सुधाकर गवई, रेखाताई बेद्रे, अन्नपुर्णा जोशी, प्रीती लंवडे व कृषि उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचार्‍यांचा समावेश होता. चार ही पथकामध्ये पंच म्हणुन रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी व्ही.बी. देशमुख, जी. एम. पावडे, पी. जे. राजे, पी. जी. नरवाडे, पी. व्ही. सपकाळ व गटसचिव सुनिल पवार व ज्ञानेश्‍वर मुंढे यांनी काम पाहीले.
सदर धाडसत्रामध्ये जप्त केलेल्या दस्तऐवजाची तपासणी करुन रक्कमेच्या निश्‍चितीबाबत महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 15 व 16 नुसार एम. बी. बनसोडे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रिसोड हे पुढील चौकशी करीत आहेत. व त्यानंतर संबधीत अवैध सावकारांचे विरुध्द पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था रिसोड यांनी कळविले आहे.