एअर इंडियात मोठी नोकरभरती

    दिनांक :13-Feb-2020
नवी दिल्ली,
एअर इंडियाच्या एअरलाइन अलाइड सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये विविध पदांवर भरती होत आहे. फ्लाइट डिस्पॅचर, ऑफिसर सुपरवायजर आणि अन्य पदांसाठी ही भरती होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत ४ मार्च आहे. पदवीधर उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात.
 

air india_1  H  
 
पदाचे नाव आणि संख्या
इन फ्लाइट सर्विसेज (केबिन सेफ्टी) प्रमुख - १ पद
उप मुख्य वित्त अधिकारी - २ पदे
सहाय्यक महाव्यवस्थापक सुरक्षा - १ पद
सहाय्यक महाव्यवस्थापक संचालन प्रशिक्षण - १ पद
सिंथेटिक फ्लाइट इन्स्ट्रक्टर - २ पदे
सिनिअर मॅनेजर - ऑपरेशन्स कंट्रोल सेंटर - १ पद
सिनिअर मॅनेजर - फायनान्स - १ पद
पर्यवेक्षक - ५१ पद
सिनिअर मॅनेजर - प्रोडक्शन प्लानिंग कंट्रोल - २ पदे
सिनिअर मॅनेजर - क्रू मॅनेजमेंट सिस्टीम - २ पदे
व्यवस्थापक - वित्त - १ पद
व्यवस्थापक - संचालन व्यवस्थापक - २ पदे
फ्लाइट डिस्पॅचर - ७ पदे
संचालन नियंत्रण - ३ पदे
अधिकारी - १ पद
क्रू कंट्रोलर - ९ पदे
 
पात्रता
वरील अनेक पदांसाठी शैक्षणिक पात्रता केवळ पदवीधर असणे ही आहे. मात्र काही पदांसाठी विविध प्रकारची शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
 
वय
अनेक पदांसाठी कमाल वय ४० ते ४५ वर्षे आहे.
 
असा करा अर्ज
इच्छुक उमेदवार एअर इंडियातील भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात. यासाठी त्यांना www.airindia.in या संकेतस्थळावर क्लिक करावे लागेल.