लाचखोर महिला अधिकाऱ्याला रंगेहात अटक

    दिनांक :13-Feb-2020

lady officer arrested_1&n
अकोला,
कापड व्यावसायिकाचा कर कमी करण्यासाठी लाच मागणार्‍या राज्य कर अधिकारी शुभांगी रामचंद्र डगवार यांना आज पंधरा हजारांची लाच घेताना त्यांच्या कार्यालयात अटक करण्यात आली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याने केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. जीएसटी विभागातील या लाचेच्या प्रकरणाने या विभागातील लाचेचा विषय समोर आला आहे. दरम्यान, अतिशय दुर्लक्षित असे हे कार्यालय असून या कार्यालयातून व्यापार्‍यांना होणारा त्रास तक्रारदाराने समोर आणला. जीएसटी विभागातील या लाच प्रकरणानंतर या विभागातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. तक्रारदार याचा कापड व्यवसाय असून 2011, 2012 या वर्षातील कापड व्यवसायाचा कर कमी करण्यासाठी पंधरा हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात तक्रारदाराने तक्रार केल्यानंतर जीएसटी विभागात राज्य कर अधिकारी यांना तिच्या बारा ज्योर्तिलिंग मंदिराजवळील जीएसटी कार्यालयात ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे जीएसटी विभागात मोठी खळबळ माजली आहे. शुभांगी रामचंद्र डगवार हिला आज लाच विभागाने पंधरा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक एस. एस. मेमाणे,तपासी अधिकारी ईश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात कारवाई पथकामध्ये गजानन दामोदर, राजेश गोमासे, निशिदिनी धर्माळे यांचा समावेश होता.