भारतीय कंपनीची Ola लंडनमध्ये धावणार

    दिनांक :13-Feb-2020
नवी दिल्ली,
भारतात अॅपवरून कॅब सर्विस पुरवली जाणारी खासगी कंपनी ओलाने आणखी आता सातासमुद्रापार पाऊल ठेवलं आहे. ओलाने ब्रिटनच्या राजधानीत आपली कॅब सर्विस सेवा सुरू केली आहे. कन्फर्ट, कन्फर्ट एक्सएल आणि एक्झिक्यूटिव्ह राईड या तीन गटात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. कंपनीकडे २५ हजारांहून अधिक चालकांची नावं नोंदणीकृत आहे.
 
ola_1  H x W: 0
 
लंडनमध्ये कॅब सर्विस इंडस्ट्रीजमध्ये जागतिक ताकत आणि नंबर वन कंपनी बनवण्यासाठी आमचा प्रवास सुरू होणार आहे. खूप कमी भारतीय ब्रँड आहेत जे या स्थानावर पोहोचतात. आमचा प्रवास आणि यश एक नवा पायंडा पाडेल, असे ओलाचे सह संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी भविश अग्रवाल यांनी सांगितले. पुढील तीन महिने आमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहेत. चालक, सुरक्षा आणि स्थानिक नियमांवर कंपनीचा जास्त फोकस असणार आहे. आम्ही लंडनमध्ये ही सेवा सुरू करण्यासाठी फार उत्साहित आहोत. आमच्या व्यवसायाच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. लोकांना जोडण्यासाठी आम्ही उचललेले हे आमचे योग्य दिशेला जात असलेले पाऊल आहे, असे ओला आंतरराष्ट्रीय प्रमुख सिमॉन स्मिथ यांनी सांगितले.
ओलाने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये कार्डिफ मध्ये ही सेवा सुरू केली होती. त्यानंतर आता ब्रिटनमध्ये सुरू करण्यात येणार आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय स्तरावर ओलाने ऑस्ट्रेलियामधील पर्थमध्ये ही सेवा सुरू केली आहे. पर्थमध्ये ओला उबरला टक्कर देत आहे. त्यानंतर ओलाने ऑस्ट्रेलियाच्या सात शहरात ४० हजारांहून अधिक चालकांचा विस्तार केला आहे. तसेच ८५ हजार हून अधिक चालकांचा विस्तार करीत ओलाने न्यूझीलंडमध्ये आपली सेवा सुरू केली आहे.