सुखी आयुष्यासाठी...

    दिनांक :14-Feb-2020
नैराश्य, अडथळे, अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतात. यामुळे खचून जायचं नसतं तर सकारात्मक विचारांनी आयुष्य जगायचं असतं, हे सांगणारी ही काही उदाहरणं...
 

sukhi _1  H x W 
 
 
नैराश्याने ग्रासलेली एक व्यक्ती अरस्तू यांच्याकडे आली. आयुष्याचा कंटाळा आला असल्याचं आणि मरायची इच्छा असल्याचं त्याने अरस्तूंना सांगितलं. अरस्तू आपल्याला मदत करतील, मार्ग दाखवतील असं त्याला वाटलं. पण झालं उलटं. अरस्तू म्हणाले की, असं असेल तर तू मरायला हवं. नैराश्यात जगणार्‍या, नकारात्मक वृत्ती बाळगणार्‍या माणसांचं जगणं मृत्यूपेक्षाही वाईट असतं. त्यामुळे तू जगून काहीही फायदा नाही. आयुष्यात कायम सकारात्मक विचार अंगी बाणवायला हवा. आशावादी मनुष्याची प्रगती होते. आशावाद म्हणजे माणसाचा मानसिक सूर्योदय. तुझ्यात आशावाद नसेल तर जगण्याला काहीच अर्थ नाही. हे ऐकून त्या व्यक्तीने बोध घेतला आणि आयुष्य आनंदाने जगण्याचं ठरवलं.
 
 
मुन्शी प्रेमचंद म्हणतात, जीवनात अनेक बरे-वाईट प्रसंग येत असतात. निराशेतही आशा दिसते. निराशेवर विजय मिळवून आयुष्याला त्याचा खरा अर्थ देण्याचा प्रयत्न करा. सत्कर्म करत राहा. निवडलेल्या मार्गावर चालत राहा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आपण निराशावाद सोडायला हवा. औदासीन्य, निराशा ही आयुष्याची प्रतिकं नाहीत. परोपकार करून आनंद मिळवणं हा जीवनाचा खरा उद्देश आहे. बिकट प्रसंगांना घाबरून निराशावादी वृत्ती जोपासली तर आपण आपलं आणि इतरांचं भलं करू शकणार नाही. त्यामुळे आशावाद हेच सुखी आयुष्याचं गमक आहे.