गौतम नवलखा, तेलतुंबडे यांना उच्च न्यायालयाचा दणका; अटकपूर्व जामीन फेटाळला

    दिनांक :14-Feb-2020
मुंबई,
भीमा कोरेगाव प्रकरणी गौतम नवलखा आणि आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दोघांना अटकेपासून ४ आठवड्यांचा दिलासा देण्यात आला आहे.
 

gautam navlakha_1 &n 
 
कोरेगाव भीमा हिंसाचार व शहरी नक्षलवाद प्रकरणी आरोपी असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा व प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला होता. त्याशिवाय या दोघांना सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याचा आदेश न्यायालयाने द्यावा, या राज्य सरकारच्या अर्जावरील निर्णयही न्यायालयाने राखून ठेवला होता.
कोरेगाव भीमा हिंसाचार व शहरी नक्षलवाद प्रकरणी पुणे पोलिसांनी नवलखा व तेलतुंबडे यांच्यावर २०१८ ऑगस्टमध्ये गुन्हा नोंदविला. नवलखा यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, न्यायालयाने गुन्हा रद्द करण्यास नकार दिल्यानंतर नवलखा यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. तर तेलतुंबडे यांनी आधीच अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.