निर्भया दोषींचे नवे 'डेथ वॉरंट' पुन्हा लांबणीवर

    दिनांक :14-Feb-2020
नवी दिल्ली,
‘निर्भया’ प्रकरणात फाशीची शिक्षा झालेल्या चारही खुन्यांविरुद्ध नव्याने ‘डेथ वॉरंट’ काढण्यासाठी केलेल्या अर्जांवरील सत्र न्यायालयातील सुनावणी १७ फेब्रुवारीपर्यंत पुढे गेली आहे.
 

nirbhaya aropi_1 &nb 
मुकेश, विनय व अक्षय यांचे दयेचे अर्ज राष्ट्रपतींनी फेटाळले आहेत व पवन याने मुदत संपूनही ‘क्युरेटिव्ह याचिका’ वा दयेचा अर्ज केलेला नाही, त्यामुळे १४ दिवसांचे अंतर ठेवून सर्वांविरुद्ध नवे ‘डेथ वॉरन्ट’ लगेच काढावे, असे अर्ज पीडितेचे पालक व दिल्ली प्रशासनाने केले आहेत. मात्र राष्ट्रपतींच्या निर्णयाविरुद्ध विनयने केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी निकाल देईल.
पवन गुप्ता याने अद्याप वकील केला नसल्याने कायदेशीर मार्ग अनुसरण्यासाठी त्याला अवधी मिळावा यासाठी न्या. धर्मेंद्र राणा सोमवारी सुनावणी घेतील. पवनचा वकील उभा राहिल्याखेरीज सुनावणी घेणार नाही, असे नमूद करत न्या. राणा म्हणाले की, ‘डेथ वॉरन्ट’ खूप संवेदनशील विषय आहे. गुन्हेगाराला सर्व कायदेशीर हक्क उपलब्ध असतात. न्यायालय ते डावलू शकत नाही.