हिंदुत्वाचे अवकाश आणि राज ठाकरे

    दिनांक :14-Feb-2020
विश्लेषण
 रमेश पतंगे
 
नागरिकत्व कायदा संमत झाला. संसदेने तो बहुमताने पारित केला. लोकशाहीच्या नियमाप्रमाणे आणि राज्यघटनेच्या कलमाप्रमाणे कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून कायदा करण्यात आला आहे. संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्षाला विरोधी पक्षाने सतत विरोध करायचा असतो. कधी कधी हा विरोध, विरोधासाठी विरोध या प्रकारात जाऊन बसतो आणि कधी कधी विरोध हा सर्व मर्यादा सोडून करण्यात येतो. विरोध करत असताना राष्ट्रहीत गेले खड्ड्यात, आम्ही आमचा निवडणूक स्वार्थच बघू, एवढाच एक निष्कर्ष राहतो. नागरिकत्व कायद्याचा विरोध या प्रकारात मोडणारा आहे.
 
 
raj_1  H x W: 0
 
हा नागरिकत्व कायदा मुसलमानांच्या विरोधात नाही. देशातील कुठल्याही मुसलमानाचे नागरिकत्व समाप्त केले जाणार नाही. परदेशातून जे मुसलमान भारतात घुसले आहेत, त्यांच्या नागरिकत्वाचा प्रश्न आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेस, केरळमधील डावी आघाडी या सर्वांनी मुसलमानांच्या डोक्यात हे घुसवायला सुरुवात केली की, तुमचे नागरिकत्व काढून घेतले जाणार आहे, तुम्हाला भारतातून हाकलून लावणार आहेत, वगैरे... त्यांनी ठिकठिकाणी बुरखाधारी महिलांना आंदोलन करण्यासाठी आणले. या बुरखाधारी महिलांना कायदा किती समजतो, संविधान किती समजते, याविषयी न लिहिलेले बरे.
 
 
 
त्यांचा प्रयत्न हळूहळू मुसलमानांना रस्त्यावर आणण्याचा आहे, त्यांनाहिंसक करण्याचा आहे. त्यांची अपेक्षा अशी आहे, ज्या ठिकाणी भाजपाचे शासन आहे, त्याठिकाणी मोर्चेकर्‍यांवर लाठीमार, गोळीबार होईल, मग त्याचे भरपूर भांडवल करता येईल. एक अकलाख मेला, वातावरण असे करण्यात आले की, लाख अकलाख मेले. प्रसिद्धी माध्यमांना मॅनेज करणे त्यांना खूप सोपे जाते. या प्रसिद्धी माध्यमांचे वर्णन काही ज्येष्ठ पत्रकार ‘प्रेस्टिट्यूट’ ( प्रोस्टिट्यूटचा प्रतिशब्द) असे करतात.
 
 
 
हे आंदोलन दिसायला मोदी शासनाविरुद्ध आहे. शासनाविरुद्ध आंदोलन करण्यासाठी खूप विषय आहेत. मध्यंतरी कांद्याचे भाव वाढले होते. आंदोलनासाठी तो एक विषय होता. आर्थिक परिस्थिती चांगली नाही, हा एक आंदोलनाचा विषय आहे. यापैकी कोणताही विषय कॉंग्रेस आणि त्यांच्या साथीदारांनी घेतलेला नाही. या विषयात मुसलमान आणि ख्रिश्चनांना रस्त्यावर उतरविण्याचे सामर्थ्य नाही. त्याने मतबँका तयार होत नाहीत. आम्ही मुसलमानांचे रक्षणकर्ते आहोत, असा संदेश जात नाही.
मुसलमानांना घेऊन आंदोलन करणार्‍यांना त्यांच्या भाषेत उत्तर देणे आवश्यक होते.हिंदू समाजाची ती भूक होती, त्याची मागणीदेखील होती. ज्यांनी हे उत्तर द्यायला पाहिजे, त्यातील एका पक्षाचे प्रमुख मुख्यमंत्रिपदाची खुर्ची उबवीत बसले आहेत. नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात केली जाणार नाही, असे ते बोलतात. त्यांना मुसलमानांचे साथीदार कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना दुखवायचे नाही. दुखवले तर खुर्चीचे दोन पाय तुटून पडतील. दुसरा पक्ष आमची सत्ता गेली, आम्ही सत्तेवर येणार, शिवसेना आमच्याबरोबर येणार म्हणून गुडघ्याला बािंशग बांधून बसलेला आहे. या दोन्ही पक्षांनाहिंदू समाजाविषयी आणि दीर्घकालीन विचार करता त्याच्या अस्तित्वासंबंधी जे प्रश्न निर्माण झालेले आहेत, त्याकडे लक्ष द्यायला वेळ नाही. प्रत्येकजण आपापल्या प्रतिष्ठेच्या कोशात गुंग झालेला आहे.
 
 
 
अशा वेळी मनसेचे राज ठाकरे मैदानात उतरलेले आहेत. त्यांनी 9 फेब्रुवारीला मुंबईत नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ प्रचंड मोर्चा काढला. तसेचहिंदूंच्या भावभावना व्यक्त करणारे सणसणीत, तिखट आणि परखड भाषण केले. ‘दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर देऊ,’ ही भाषा त्यांनी वापरली. भारत म्हणजे काही धर्मशाळा नव्हे, जे पाकिस्तानी आणि बांगलादेशी भारतात घुसले आहेत, त्यांना भारतातून हाकलून लावले पाहिजे. भारतात जन्मलेला मुसलमान शांततेत राहू इच्छितो, परंतु बाहेरून आलेले मुसलमान गडबडी करीत असतात. कोणत्या तरी राजकीय नेत्याने असे घणाघाती भाषण करावे, ही जनतेची अपेक्षा होती. राज ठाकरे यांनी ती पूर्ण केली. लोकांच्या मनात काय आहे, हे त्यांनी जाणले. त्याला वाट करून दिली.
 
 
 
एक काळ असा होता की,हिंदूंचा पक्ष घेऊन बोलणे, महापातक समजले जाई. ज्या ज्या लोकांनी हिंदूंचा पक्ष घेतला, त्या सर्वांना खलनायक ठरविण्यात आले. स्वातंत्र्यवीर सावरकर, श्रीगुरुजी यांच्याबद्दल अतिशय वाईट भाषेत लिहिले गेले. अशावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या आधारे राजकारण करायला प्रारंभ केला. कोर्टात केस झाली. या सर्व दिव्यातून बाळासाहेब ठाकरे यांना जावे लागले. त्यांचा हा वारसा तेवढ्याच जोमाने पुढे नेण्याची गरज होती. त्यांच्या मुलाला वारशापेक्षा गादीची ऊब महत्त्वाची वाटली आणि त्यांनी असंगाशी संग केला. आज ते म्हणतात, ‘मला माझे हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही. कारण, ते बाळासाहेबांचे हिंदुत्व आहे. ते शुद्ध आहे. मी माझ्या पक्षाचा झेंडा बदलला नाही, एक माणूस एक झेंडा हे आमचे ठरलेले आहे. जगाला ठावुक आहे आपले हिंदुत्व काय आहे?’ राज ठाकरे यांच्या मोर्चाचा टोला योग्य जागी बरोबर जाऊन बसला आहे, एवढाच त्याचा अर्थ.
 
 
 
महाराष्ट्रात आताहिंदुत्वाचा विषय घेऊन राजकारण करणारे तीन पक्ष झाले आहेत- शिवसेना, भाजपा आणि मनसे. दुसर्‍या भाषेत राजकारणाच्याहिंदुत्वीकरणाला आता वेग येत चाललेला आहे.हिंदुत्वाची जागा व्यापण्यासाठी या तिन्ही पक्षांत स्पर्धा लागेल. आमचेचहिंदुत्व खरे, तुमचे बेगडी, अशी भाषा भविष्यात ऐकायला आली तर त्याचे आश्चर्य वाटू नये. आजचा विचार करता तिन्ही पक्षात शिवसेना ही कोंडीत सापडलेली आहे. एका बाजूला कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सोबत, पिता आणि मुलाचे मंत्रिपद, आणि दुसर्‍या बाजूला बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा वारसा. एक धरून ठेवायचा तर दुसरा सोडावा लागतो. आज ना उद्या शिवसेनेला याचा अंतिम निर्णय करावा लागेल. भाजपा संघविचारधारेवर चालणारा पक्ष आहे. संघाची विचारधारा प्रत्यक्षपणे सत्तेशी संबंधित नाही, परंतु तिचा प्रभाव सत्तेवर फार मोठ्या प्रमाणात पडत असतो. संघाची बांधिलकीहिंदू विचारांशी आहे, सत्तेशी नाही. जेव्हा सत्ता कीहिंदुहित असा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा संघहिंदुहिताच्या बाजूने उभा राहतो. काही इतिहास कडू असतात. त्याच्या आठवणी काढल्या असता काहीजणांना आवडत नाहीत. पण इतिहास विसरता येत नाही. 2004 साली केंद्रात भाजपाचा पराभव झाला. सरकार उत्तम प्रकारे चालू असतानादेखील पराभव झाला. कॉंग्रेसला अनुकूल वातावरण नसतानादेखील भाजपाला सत्ता बनविण्याइतक्या जागा मिळाल्या नाहीत. दिल्लीतील एका ज्येष्ठ पत्रकाराने (स्वपन दासगुप्ता) याने पराभवाचे कारण ‘क्वाएट हिंदू’ म्हणजे हिंदू शांत बसला, अशा मोजक्या शब्दात सांगितले.
 
 
मनसेलाहिंदुत्वाची जागा व्यापण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतील. ध्वज बदलला, प्रचंड मोर्चा काढला, ही चांगली सुरुवात आहे. पण हे जर टर्मिनस झाले तर काही खरे नाही. हिंदुत्वाचे विषय सातत्याने पुढे येत राहतील. ते स्वीकारावे लागतील. राजकीय भाषेत आणि कार्यक्रमात ते आणावे लागतील. सतत हिंदू मानसिकतेच्या बरोबर राहावे लागेल. एक हजार वर्षांच्या पारतंत्र्याने राष्ट्रीयहिंदू मनावर अतिशय खोलवरच्या जखमा झालेल्या आहेत. औरंगजेबाने संभाजी महाराजांचे केलेले तुकडे येथून जर सुरुवात केली तर पृथ्वीराज चौहान यांचा हालहाल करून झालेला मृत्यू, गुरुगोिंवद िंसगांच्या चार बालकांचा क्रूर मृत्यू, पद्मिनीचा जोहार... विषयांची मालिका संपणार नाही आणि यातला कुठलाही विषय असा नाही की जो येणार्‍या काळात मोठा बनून समोर येणार नाही. एक रामजन्मभूमीचा अपमान धुवून काढला गेला. अन्य अपमानाचे काय?
ही राष्ट्रीय सूची ऐकूनच भीतीचे कापरे भरते आणि ज्यांची विजार ओली होते, त्यांना आपल्याकडे पुरोगामी, मानवतावादी, वैश्विक विचार करणारे म्हणतात. त्यांना त्यांच्या विश्वात जगू द्या. आपल्यालाहिंदू म्हणून उभे राहायचे आहे,हिंदू म्हणून जगायचे आहे आणिहिंदू म्हणून पराक्रम करायचा आहे. राजकारण त्याचे एक क्षेत्र आहे. या क्षेत्रात नव्या दमाने राज ठाकरे उतरले आहेत. त्यांचा दम टिकून राहो आणि अशीच वाटचाल त्यांनी आयुष्यात करीत राहावी, यासाठी त्यांना शुभेच्छा देऊ या!
 
 
(लेखक ज्येष्ठ विचारवंत व
साप्ताहिक विवेकचे माजी संपादक आहेत)