सॉफ्टवेअर फॉर दी ब्रेन

    दिनांक :27-Feb-2020
|
द. वा. अंबुलकर 
 
sofrt _1  H x W
 
आता परीक्षेचे दिवस आहेत म्हणून ही खास चर्चा...
 
मेंदूची बांधणी फार कौशल्याने केलेली दिसते. सामान्य आधुनिक माणसाला, कामापुरते तरी वैद्यकीय ज्ञान असावे. मानवी मेंदू हाडांच्या छानशा ऐटीन उर्फ ‘क्रेनियम’ मध्ये बसवलेला असतो. त्याचे वजन 1300 ते 1400 ग्रॅम्स व आकारमान तेवढेच घनसेंटीमीटर असते. मेंदूची वाढ ( किंवा विकास) पहिल्या सहा वर्षातच होते. मेंदूत दशलक्ष न्यूरॉन्स असतात. सगळ्या ऐच्छिक क्रियांवर यांचा ताबा असतो. दृष्टी, चव, ध्वनी, स्पर्श, बोलणे वगैरे सर्व ज्ञान केंद्रावर यांची सत्ता असते. स्मरणशक्ती, इच्छाशक्ती, बुद्धीमतत्ता, तर्कशक्ती, ग्रहणक्षमता यांच्या ताब्यात भावनांचा, सुखदुःखांचा, रडण्या-हसण्याचा हाच मुरारी. तापमान दाब, वेदना सगळं काही ब्रेनच ओळखतो.
 
 
आता तुम्हीच सांगा मेंदूची, देहाची, शरीरव्यापांची जडणघडण कोण जमवून आणतो? कुठेतरी अदृश्य शक्ती असलीच पाहिजे. पाटलीचा घाट, गाण्याची बंदिश, स्वेटरची वीण, सैन्याची उभारणी... सर्व ठिकाणी एक क्रम किंवा प्रोग्रॅम दाखवून देतात. प्रोग्रॅमशिवाय काहीच नक्की होणार नाही. थिंकिग मेक्स अे मॅन’ हेच खरं.
 
 
विचारांमुळेच माणूस घडतो. ‘विचारसरणी’ किंवा ‘थिंकिग पॅटर्न सर्वात महत्त्वाचा.
माणसाची जडणघढण नक्की कशी होत असेल याबाबतीत खालचे मुद्दे लक्षात घ्या : -
 
विचारसरणीचा दोष-1
माणूस भूतकाळात झालेली एखादी अप्रिय घटना, हीच आपल्या आताच्या प्रतिकूल परिस्थितीस कारण आहे, म्हणून ऊरे बुडवून घेतो. त्या घटनेचा वारंवार उल्लेख करतो व नवीन सकारात्मक विचारांऐवजी ठप्प मनाने कपाळाला हात लावून बसतो.
 
 
विचारसरणीचा दोष- 2
माणूस विचारांचे अवडंबर माजवतो, किंवा हॅम्लेटसारखी सतत उलटसुलट विचार करत बसतो. विपरीत परिस्थितीवर काय इलाज करावयाचा, याचा अजिबात विचार करत नाही.
एकदा कमी गुण मिळाले की ‘मी मठ्ठच आहे. मी कधीच पास होऊ शकणार नाही.’ अशा प्रकारच्या टोकाच्या विचारसरणीचा अवलंब करतो, आणि खिन्न होत जातो.
 
 
वरीलप्रमाणेच, पण जरा विचित्र दोष पाहा-
हा माणूस प्रत्येक बारीकसारीक गोष्टींत परिपूर्णता (पर्फेक्शन)... मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न करतो. परंतु तो फलद्रूप न झाल्यास, आपण फार कुचकामी आहोत, असा समज करुन घेतो, ही गोष्ट तर फारच घातक असते. अशी कचखाऊ वृत्ती, माणसाला सुखाने जगू देत नाही. हा मनुष्य म्हणजे ‘परफेक्शनिस्ट’ स्वतःला वैफल्याची टोचणी लावून स्वतःकडे विनाकारणच कमीपणा, घेऊन जगत असतो. हा ‘न्यूनगंड’ किंवा ‘इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स’ नाशालाच कारणीभूत ठरतो.
विचारसरणीचा चौथा दौष हा राईचा पळत करणार्‍या विचाराचा.
 
 
कुणी ओळखीच्याने, आपल्याला वाटेत ओळख दिली नाही. की हा माणूस एकदम निराश होतो. त्या मित्राचे आपल्याबद्दल मत चांगले नसावे, असा विचार याच्या मनात झळकतो.
अनेकवेळा, आपल्या मनामध्ये जे काही गैरसमज झालेले असतात, ते आपल्या या सदोष विचारसरणीमुळेच. काहीतरी ग्रह करून घ्यायचा व धुसफुसत बसायचं, असं काही बर्‍याच लोकांचं होत.
विचारसरणीचा पाचवा दोष म्हणजे, दुसरी माणसे आपल्याला फसवायलाच बसली आहेत. असे एकसारखे वाटणे. या मंडळीना जगातले सर्व लोक दुष्टच आहेत असे वाटते.
 
 
आता या याच विचारसरणी किंवा थिंकिंग पॅटर्नसवरही पुन्हा पुन्हा विचार करत बसायचे नाही. एकदा अंदाज आला ना? वैद्यकीय ज्ञानाची अल्पशी मदतही घेतली. तेव्हा मेंदूला हुकूम सोडून, तुमच्या क्षेत्रांत प्राविण्य मिळवा. गायकाने गायकी सुधारावी तंत्रज्ञाने नवीन तंत्रे आत्मसात करावीत. तुमच्या ‘मानसिक यंत्राला’ नेहमी तेलपाणी करा. ‘ऑफन अरेव्हरहॉल युअर माइन्ड’