शांत झोपेचं महत्त्व

    दिनांक :14-Mar-2020
|
रात्रीची शांत झोप अत्यंत महत्त्वाची असते. प्रत्येकाने रात्री किमान आठ तास तरी झोपायला हवं. पण आपण अनेकदा पर्याप्त झोप घेण्याकडे दुर्लक्ष करतो. सहाजिकच अपुर्‍या झोपेमुळे आरोग्यावर दुष्परिणाम दिसू लागतात. ते दूरगामी ठरण्याची शक्यता असते. म्हणूनच ही बाब गांभीर्याने हाताळायला हवी. 

zop_1  H x W: 0 
 
  • अपुर्‍या झोपेमुळे मन एकाग्र होत नाही. कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही. झोप झाली नसेल तर तुम्हाला अस्वस्थ वाटत राहतं. सतत झोप येत राहते. चहा-कॉफीसारखी उत्तेजक पेयं घेऊनही काही उपयोग होत नाही. या सगळ्याचा परिणाम कामावर होतो.
  • अपुर्‍या झोपेमुळे दीर्घकालीन आणि अल्पकालीन स्मरणशक्तीवर दुष्परिणाम होतो. झोप कमी तेवढा मेंदूच्या आरोग्यावर विपरीत परिणाम हे समीकरण जाणून घ्यावं.
  • पुरेशी झोप मिळाली की शरीरयंत्रणाही सुरळित राहते. अपुर्‍या झोपेमुळे प्रतिकारशक्ती कमी होते.
  • नीट झोप होत नसेल तर तुम्हाला उच्च रक्तदाबाची समस्या सतावू शकते. पाच तासांपेक्षा कमी झोप घेत असाल तर हृदयावर घातक परिणाम होऊ शकतात.
  • अपुर्‍या झोपेमुळे जास्त भूक लागते. सतत खावसं वाटतं. अतिखाण्यामुळे वजन वाढतं. कमी झोपेमुळे भूक निर्माण करणार्‍या हार्मोन्समध्ये वाढ होते तर भुकेवर नियंत्रण ठेवणारे हार्मोन्स कमी होतात.
  • अपुर्‍या झोपेमुळे शरीरातल्या इन्शुलिनचा वापर योग्य प्रकारे होत नाही आणि मधुमेह जडण्याची शक्यता वाढते. पप