कोरोना : हेच कराना..!

    दिनांक :15-Mar-2020
|
पंकज पातूरकर
 
आता करोना किंवा कोरोना वरून काय काय करोना, (आणि क्या मत करोना.) हे सांगितलं जात आहे. आपल्याच लोकांना नव्हे; तर इतर देशातसुद्धा हिंदू संस्कृतीच्या जीवन शैलीत किती मोठं विज्ञान आहे, हे या कोरोना व्हायरस टाळण्यासाठी जी नियमावली सांगितली आहे त्यातच हे सिद्ध होतं. साधारण जीवनात ‘आपला तो बाब्या, दुसर्‍याचा तो कारटा’, असं समीकरण असतं; पण स्वधर्म, परंपरा संस्कृती असले विषय आले की या विषयात ‘आपला तो कारटा आणि दुसर्‍या चा तो बाब्या’, असं मत आपण किती पुढारलेलो आहोत, हे दाखविण्यासाठी हे चार चौघात सांगणारे कमी नाही. आपला विश्वास योगसामर्थ्यावर नाही बसत, तर आपलाच योग परदेशातून फिरून जेव्हा एरोबिक बनून येतो; तेव्हा आपण लगेच योगा मॅट विकत घेऊन एअर कंडिशन हॉल मध्ये ते करायला लागतो. घरच्या घरी फुकट करा, ही योगशास्त्र ही आपली प्राचीन देणगी आहे, असा सल्ला कोणी दिला, तर तोच योग फालतू वाटतो. सांगायचा उद्देश की, आपण आपलं सोडलं आणि गोर्‍या बाबूंच खरं मानायला लागलो. ही सुटबुटातील जीवन पद्धती आदर्श वाटायला लागली. 
 
corona _1  H x
 
 
आपल्या भारतीय सामान्य जीवन पद्धतीची, उत्कृष्ठ नियमावली आपल्याकडे असताना तिचा त्याग करून, बरबटलेल्या, उसन्या विचारांना आपण धन्य मानायला लागलो. पुढारलेपणाच्या नावाखाली आपल्या परंपरेला दूषणं देण्यांत धन्यता मानायला लागलो. हे करताना गेल्या पन्नास- साठ वर्षात आपण आपल्याच पासून फार दूर येऊन गेलो की, आपलीच अभिवादनाची पद्धत उत्तम आहे हे इझ्राईलचे पंतप्रधान नेतन्याहु यांना आपल्याच सांगून जाग करावं लागलं. आपल्याकडे गेल्या काही वर्षांत एक टोळी सक्रिय झाली आहे. आज जी निसर्गाची दुर्दशा झाली ती फक्त िंहदू संस्कृती, परंपरा यांनीच झाली, हे सिद्ध करण्यासाठी ही टोळी जीवाचा आटापिटा करत असते. होळी, दिवाळी, नागपंचमी, गणपती, अशा अनेक सणांमध्ये निसर्ग जपण्यासाठी केलेला खटाटोप या टोळक्याला दिसत नाही. यातून निसर्गाची हानी कशी होते, हे पटवून देण्याचें व्रतचं अनेक विद्याविभूषितांनी घेतलेलं आज दिसतं. काय तर म्हणे शंकराला बेल वहायला की बेलाची झाडं तोडल्या जातात, दसर्‍याला आटापाट्याची पान वाटून ते झाड संपत चालल आहे आणि जगातील पाणी हे फक्त होळीमुळेच संपत चाललं आहे... असे अनेक जावईशोध सध्या लागत आहेत. या परंपरा हजारो वर्षांपासून असताना हे वृक्ष संपले काय? वृक्ष तोड वेगळी आणि त्याची पानं तोडणं वेगळं.
 
 
असाच मध्यंतरी व्हॉटस्‌ अॅप विद्यापीठांत एक संदेश येत होता, मृत्यू नंतर जी राख आपण नदीत विसर्जन करतो त्यांनी म्हणे नद्या सध्या खूप पोल्युटेड होतात आहेत, ती राख घरच्या झाडांना घाला. म्हणे त्यामुळे खत मिळेल. जसे खत तयार करायला हे एकंच माध्यम सध्या उरलं आहे. एका साध्या हिशोबाने पाहिलं तर, आपल्या पंधरा एक पिढ्यांपासून राख नदीत शिरवतात त्यामुळे, तर सर्वच नद्या आतापर्यंत सडून जायला हव्या होत्या. वास्तविक ज्या मुख्य कारणामुळे या पवित्र नद्यांच रूपांतर सांड पाण्यात झालं आणि ज्या मुख्य सिस्टीममुळे झालं त्यावर ही मंडळी काहीच बोलत नाही. त्या कारखान्यांच्या विरोधांत ही मंडळी आंदोलन नाही करत. वास्तविक जी ऊर्जा जिथे खर्च व्हायला हवी तिथे न होता भलत्याच विषयात या व्रतस्थ लोकांची होत असते.
 
 
भारतीय स्वागताची पद्धत ही अलिगंन नाही त नमस्ते आहे हे सहज आपल्याला समजलंच नाही. प्रेम दाखवायचं असेल तर आलिंगन हा एकच मार्ग चित्रपटाचा विषय होऊन सामान्य लोकांना, आभासी जगतातून सांगितला जातो. आज आपल्या िंहदू धर्माच्या आदर्श परंपरे सारखी वैज्ञानिक अधिष्ठान असलेली परंपरा नसेल; पण आपण रोग झाल्यासारखे आपल्याच तत्वांना तिलांजली दिली.
 
 
काल- परवाच एक बातमी होती की, मल्टिप्लेक्सच्या बाहेर ग्राहकांसाठी बाहेर हात धुवून आत जाण्याची व्यवस्ता केली. त्यासाठी चार माणसं नेमण्यात आली. फक्त पाण्याच्या जागी सॅनिटायझर वापरण्यात आलं. पूर्वी एक नियम अनेक घरांमध्ये आवर्जून पाळल्या जायचा. अर्थात अनेक घरामध्ये तो आजसुद्धा पाळल्या जातोच. बाहेरून घरामध्ये प्रवेश करताना हात-पाय धुवूनच घरात यायचं. अनेक मंदिरांमध्ये आज ती सोय यासाठीच आहे की बाहेरचे जंतू आतल्या वास्तूत येऊ नये. त्या साठी बाहेर सुंदर असे तांब्याचे, पितळ्याचे गंगाळ असायचे. आज गंगाळ हा शब्द आपल्यासाठी ओनळखी झाला आहे. ही मोठी शोकांतिका आहे. निर्जंतुकीकरण करण्यासाठीच सोवळे म्हणजे कमालीची स्वच्छता हा उद्देश होता; पण या सोवळ्या-ओवळ्याची थोडाशी चुकीची बाजू मांडत ही पद्धत त्याज्य ठरविण्यांत आली. नियम होते ते उत्तम, निरोगी, सुदृढ जीवन जगण्यासाठी होते. महालक्ष्मी, कुळाचार, दिवाळी याचे पक्वान्न बनवताना नैवेद्य होईपर्यंत ते पदार्थ खाण्याची इच्छासुद्धा होऊ द्यायची नाही. त्या तयार होणार्‍या विशिष्ट पदार्थात वासना जाता कामा नये. तो नैवेद्य जाच्यासाठी केला आधी त्याला दाखवायचा अशी व्यवस्था होती आणि मग प्रसाद म्हणून तो घ्यायचा. केवढं मोठं लॉजिक होत त्या मागे. संयम, वाट पाहण्याची ताकत, मोह झाला तरी त्याला आवर घालणं, वासनांवर नियंत्रण या सगळ्या गोष्टी शिकण्याची ती खरी विद्यापीठं होती. जी प्रत्येक घरात होती. त्यां शिक्षण संस्थेच्या कडक मास्तरणी होत्या आज्या, आया, काकू , आत्या. जीवनात यामुळे एक शिस्त होती.
 
 
अगदी साधे- सोपे नियम होते. त्यांनी स्वास्थ उत्तमच राही. स्वयंपाक घरात आंघोळी शिवाय जायचं नाही, हा कडक नियम आजही अनेक घरात पाळल्या जातो; पण त्याला जाच, मनःस्ताप मानणारा एक वर्ग आहेच. ही सवय शुद्ध निर्जंतुकीकरण करण्यासाठी आहे इतका सोपा विषय हा होता. शिक्षण नसतानासुद्धा आपल्या पूर्वजांना जे समजले ते आपल्याला कळत नाही. गाद्यावर आपण झोपतो त्या रोज धुता येत नाहीत. अनेक बॅक्टेरिया त्यात असतात. म्हणून, आंघोळ करून स्वयंपाक घरात जाणं एवढा सोपा त्याचा अर्थ. त्या काळी घरातलं ऑपरेशन थिएटर म्हणजे स्वयंपाकघर आणि देवखोली की तिथे प्रवेश करायचा असेल तर ठराविक स्वच्छ, धुतलेले कपडेच घालून या जागेत प्रवेश असायचा. जंतूंचा प्राधूरभाव रोखण्याचे हे सर्व नियम.
 
 
आपल्याकडे सर्व गोष्टी या शास्त्राच्या आधारेच होत्या. परसाकडे या शब्दातच परस दारी असलेली जागा हा अर्थ दिसतो; पण काळ बदलत गेला. मोठ्या वाड्याची, घरांची जागा आक्रसत गेली. त्यामुळे सगळ्याच गोष्टी पाळणं आज शक्य नाही, तरीही शुद्धतेच्या दृष्टीने आखून दिलेली आपली नियमावली त्याज्य मात्र नाही.
 
 
शुद्ध अशुद्ध या विचारांना धर्माच्या चौकटीत आणून एका शुद्ध आचार असलेल्या विचार परंपरेला आपण निर्बंधात आणलं. ठराविक लोकांची मक्तेदारी म्हणून त्या कडे बघायला लागलो.
 
 
भारतात कोणते आजारच झाले नाही असं मुळीच नाही. मात्र रोगांचा सुळसुळाट नकीच नव्हता. योग्य आचार- विचारांनी जगायला शिकणारी आपली संस्कृती. शेणाच सारवण ही शुद्धता होती, तर गोमूत्र फिनॉईल, डेटॉल याच काम करायचं. पितळ, तांबे हे धातू रोज शरीरात जायचे. या भांड्याचा स्पर्श तर सोडाच या भांड्याची चकचक करणार्‍या धातूंना पाहिलं तरी मन प्रसन्न होतं. त्यात अन्न शिजवले तर मन प्रसन्न होणारच. अनेक विषय आहे जे सांगता येतील पण नुसती थोरवी गाण्यात शहाणपण नाही तर ती जीवन शैली आपण जगलो तर कोरोनाचे नियम आपल्याला पाळायची मुळीच गरज नाही.
9766319608