दलाल पथ

    दिनांक :16-Mar-2020
|
सीए अभिजित केळकर
 
 
‘बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज’ची स्थापना 1875 मध्ये दलाल स्ट्रीट (पथ) मुंबई या ठिकाणी झाली. भारतातील हे सर्वात जुने व प्रसिद्ध मार्केट आहे. राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) अस्तित्वात येण्यापूर्वी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमार्फत शेअरचे सर्व व्यवहार होत असत. 1995 पर्यंत ‘बीएसई’वर होणारे सौदे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमने होत नव्हते, मात्र 1995 पासून सर्व सौदे इलेक्ट्रॉनिक सिस्टीमने होतात. ‘बीएसई’वर आज साधरणपणे 5000 पेक्षा ज्यास्त कंपन्या नोंदल्या गेल्या असून साधरण पणे सर्व दिग्गज कंपन्यांचे व्यवहार बॉम्बे स्टोक एक्स्चेंजवर नियमितपणे होत असतात. 
 
bse_1  H x W: 0
 
आपण नेहमी ऐकतो िंकवा वाचतो, की- आज सेन्सेक्स वाढला, आज सेन्सेक्सने नवे शिखर गाठले, आज सेन्सेक्स कोसळला, लोकांचे करोडो रुपये बुडाले! पण हा नक्की काय प्रकार आहे, याबद्दल मात्र अजूनही कुतूहल आहे. आपल्या रोजच्या सहज बोलल्या जाणार्‍या सेन्सेक्स या शब्दाचा नेमका अर्थ किती लोकांना माहिती आहे? जेव्हा सेन्सेक्स वाढतो, तेव्हा सर्व शेअर्सचे भाव वाढतात का ? सेन्सेक्स कसा मोजायचा, सेन्सेक्स कोसळला िंकवा वाढला म्हणजे नेमके काय झाले, असे प्रश्न अनेकांना पडत असतील, म्हणून गुंतवणूकदारांनी सेन्सेक्स म्हणजे काय आणि तो कसा मोजतात, हे जाणून घेणं आवश्यक आहे. सेन्सेक्स हा मुंबई शेअर मार्केटची प्रगती दाखवणारा इंडेक्स आहे. त्यामध्ये काही ठराविक कंपन्या समविष्ट आहेत.
 
 
या कंपन्यांच्या भावात होणारी वाढ िंकवा घट म्हणजेच सेन्सेक्सची वाढ िंकवा घट. आज शेअर मार्केट हे देशाची अर्थ व्यवस्था व प्रगती याचा दिशादर्शक मानले जाते. मार्केटचा परफॉर्मन्स कसा चालला आहे, हे ठरवण्यासाठी इंडेक्सची आवश्यकता असते. सेन्सेक्स हा ‘बीएसई’चा इंडेक्स असून ‘बीएसई’चा परफॉर्मन्स कसा आहे, याची कल्पना सेन्सेक्स वरून येऊ शकते. सेन्सेक्स ही इंडेक्सची संकल्पना जानेवारी 1986 पासून अस्तित्वात आली. त्यासाठी 1979 हे पायाभरणी करणारे वर्षे मानले गेले. सेन्सेक्समध्ये ‘बीएसई’वर नोंद झालेल्या मोठी उलाढाल असणार्‍या, आर्थिकदृष्ट्या सक्षम असणार्‍या विवध क्षेत्रांतील अग्रगण्य अशा 30 निवडक लार्ज कॅप कंपन्यांच्या शेअर्सचा समावेश केला गेला. सेन्सेक्समध्ये सुरुवातीला समाविष्ट असणार्‍या कंपन्या यामध्ये काळानुसार बदल होत जातात, कारण सेन्सेक्समध्ये समविष्ट कंपन्यांचा नियमितपणे ‘बीएसई’ सेन्सेक्स विषयीच्या समितीकडून आढावा घेतला जातो. सेन्सेक्समध्ये सामील करताना काही आवश्यक मापदंड आहेत, त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते.
 
 
सेन्सेक्स आपल्या देशाच्या आर्थिक प्रगती दाखवत असल्याने सेन्सेक्समध्ये इकॉनॉमीमधील सर्व क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जातो. सेन्सेक्समध्ये सामील करण्यात येणार्‍या कंपनीसाठी काही बाबींची पूर्तता होणे आवश्यक आहे- जसे सेन्सेक्समध्ये समवेश असणारी कंपनी ‘बीएसई’ वरील लिस्टेड लार्ज कॅप कंपनी असली पाहिजे, कंपनीचे शेअर्सचे सौदे रोज होत असले पाहिजेत, कंपनी तिच्या क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असली पाहिजे, कंपनीला चांगली लिस्टिंग हिस्टरी पाहिजे, कंपनी नफा कमावणारी, नियमित लाभांश देणारी, आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि गुंतवणूकदारांचे हित जपणारी असली पाहिजे इत्यादी. सेन्सेक्स कसा काढला जातो ? आता हा इंडेक्स काढण्याची पद्धत पाहूया. या सेन्सेक्स मोजणीसाठी मूलभूत साल हे 1978-79 मानले आहे व निर्देशांक 100 अंक मानला गेला, म्हणजेच सेन्सेक्समध्ये सुरुवातीला समाविष्ट केलेल्या 30 कंपन्यांच्या फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल लायझेशन (बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असणार्‍या शेअर्सची बाजारातील एकूण मूल्य) नुसार त्यांचे निर्देशांकमधले वेटेज ठरवले गेले.
 
 
ज्या कंपन्यांचे फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन ज्यास्त अर्थातच त्यांचे सेन्सेक्समध्ये वेटेज पण ज्यास्त. या 30 कंपन्यांच्या फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन जसजशी वाढ िंकवा घट होत गेली, त्यानुसार सेन्सेक्समध्ये वाढ िंकवा घट झाली. सुरुवातीला फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन ही संकल्पना सेन्सेक्सच्या मोजणी साठी नव्हती. फक्त टोटल मार्केट कॅपिटलायझेशन हे सेन्सेक्स मोजणीसाठी धरले जात असे. 2003 पासून फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन सेन्सेक्स मोजणीसाठी धरले जाऊ लागले. या प्रमाणे एका विशिष्ट आकडेवारीने/पद्धतीनी सेन्सेक्स काढला जातो. सदर सेन्सेक्स विविध कारणांनी तथा विक्री आणि खरेदीच्यानुसार कमी जास्त होतच असतो. गुंतवणूकदारांनी लक्ष्यात घ्यावे, की- सेन्सेक्स वाढला िंकवा कमी झाला म्हणजे त्यात समविष्ट असणर्‍या सर्व कंपन्यांचे भाव वाढतीलच असे नाही.
 
 
मागील आठवड्यात भारतीय सेन्सेक्समध्ये फार मोठी घसरण झाली. जागतिक विविध स्टॉक एक्स्चेंज मार्केटमध्ये झालेली घसरण, मंदीसदृश्य परिस्थिती, बँकांची खालावलेली परिस्थिती आणि भरीसभर म्हणून कोरोनामुळे आयटी कंपन्यांमध्ये होणार परिणाम, येणार्‍या दिवसांत अपेक्षित असलेली मागणीची घट व व्हिसा तथा प्रवासावर आलेली बंधन इत्यादी कारणांचा सयुक्तिक परिणाम होऊन भारतातील स्टॉक एक्स्चेंज मार्केट कोसळले आहेत. मात्र हे फार काळ चालणार नाही. सदर परिस्थिती जेव्हा सुधारेल, तेव्हा सेन्सेक्स पुन्हा पूर्वपदावर येणार हे निश्चित! माझ्या मते- गुंतवणूकदारांनी काळजी करण्याची गरज नाही. उलटपक्षी, तुमच्या आवडीचे शेअर्स जर कमी भावात मिळत असतील तेर घेऊन टाका. आज जरी बाजार लाल रंगात आहे, तरीही लवकरच हिरव्या रंगात बदलणार, याबद्दल शंका नाही.
• 
9422126890