गुरूमंत्राच्या उपासनेविषयी...

    दिनांक :21-Mar-2020
|
आयुयातल्या अडचणी सोडवण्यासाठी आपल्या प्रयत्नांसोबतच विशिष्ट मंत्रही उपयुक्त ठरतात. बृहस्पती हे देवगुरू मानले जातात. बृहस्पतीच्या उपासनेमुळे ज्ञान, बुद्धी, कौटुंबिक सुख मिळतं, असं मानलं जातं. बृहस्पतीच्या उपासनेसाठी गुरूवार हा सर्वात उत्तम दिवस मानला गेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार गुरू हा शुभ ग्रह मानला गेला आहे. गुरू मंत्राच्या जापाने आयुष्यातल्या अडचणी दूर होऊ शकतात. गुरू मंत्र आणि बृहस्पतीच्या उपासनेविषयी जाणून घेऊ या.
 

guru_1  H x W:  
 
* ऊं ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे: नम:
* ऊं ऐं श्रीं बृहस्पतये नम:
* ऊं गुं गुरवे नम:
* ऊं बृं बृहस्पतये नम:
* ऊं क्लीं बृहस्पतये नम:
यापैकी एक मंत्र दर गुरूवारी म्हटल्याने अडचणी दूर व्हायला मदत होते.
 
पीतांबर पीतवपु: किरीटी चतुुर्भुजो देवगुरू प्रशान्त:। यथाक्षसूत्रं च कमण्डलुच्च दण्ड च विभ्रद्वरदोस्तु।।
 
 
या गुरूमंत्राचा जप आपल्या इष्टदेवतेला स्मरण करून करावा.
बृहस्पतीची आराधना करायची असेल तर सकाळी स्नान करून नवग्रह मंदिरात बृहस्पतीच्या मूर्तीला केशरयुक्त दूध िंकवा गंगाजलाने अभिषेक करावा. त्याला गंध, अक्षता, पिवळं वस्त्र, पिवळी फुलं अर्पण करावीत. केळं आणि पिवळ्या रंगाच्या मिठायांचा नैवेद्य दाखवावा. पूजनानंतर चण्याच्या डाळीचं दान करावं. केळ्याच्या रोपट्याजवळ तुपाचा दिवा लावावा. या उपासनेसोबतच गुरूवारी उपवास केला तर बृहस्पतीची कृपादृष्टी होऊ शकते.