विदेशवारीनंतर बाहुबली झाला आयसोलेट

    दिनांक :22-Mar-2020
|
मुंबई,
कोरोना व्हायरसच्या पृष्ठभूमीवर दक्षिण भारतीय चित्रपटांचा सुपरस्टार प्रभासने स्वतःला आयसोलेट केलं आहे. बाहुबली फेम प्रभास नुकताच एका चित्रपटाचे शूटींग पूर्ण करून जॉर्जियाहून परत आला आहे आणि म्हणूनच त्याने स्वत:ला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभासने सोशल मीडियावर या संदर्भात पोस्ट करुन याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान अनेक प्रसिद्ध व्यक्ती विदेशातून आल्यावर माहिती लपवून ठेवून लोकांध्ये मिसळताना दिसत आहे. अशा परिस्थिती प्रभासच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
 

prabhas_1  H x  
प्रभासने शनिवारी सोशल मीडियावर माहिती दिली की, विदेशात शुटींग करुन सुरक्षित परत आल्यानंतर कोविड -19 चा वाढता धोका पाहात मी स्वत:ला अलग ठेवण्याचे ठरविले आहे. मला आशा आहे की तुम्ही सर्वजण सुरक्षित राहण्यासाठी आवश्यक खबरदारी घेत आहात.
 
 
अनुपम खेर आणि शबाना आझमी यांच्यासह अनेक भारतीय कलाकारांनी विदेशातून परत आल्यानंतर स्वत: ला वेगळं केलं आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनीही सोमवारी सांगितले, की कोरोना व्हायरसमुळे कोणत्याही प्रकारचा संसर्ग टाळण्यासाठी त्यांनी स्वत:ला पूर्णपणे वेगळे केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
Appeal