व्हा स्वाभिमानी करदाता

    दिनांक :23-Mar-2020
|
समाजात अनेजण करांना कंटाळलेले दिसतात. सरकारी कररचना पटत नसल्याने त्यांचा या पध्दतीवरच रोष असतो. काहीजण कर देणार्‍यांपेक्षा कर भरण्याची गरज नसणार्‍यांची संख्या प्रचंड असल्यामुळे नाराज असतात. फुकट्यांचा भार आम्ही का वहायचा, असा त्यांचा सवाल असतो. परिणामी, कररचना, करसंकलन, त्यातल्या त्रुटी हे विषय अनेकांच्या चर्चेत आढळतात. कर देणं आणि कर घेणं, ही अपरिहार्य प्रक्रिया आहे, याविषयी दुमत असू शकत नाही. करांपासून आपली सुटका नाही, कारण त्या निधीवरच देश चालतो आणि आपण त्याचे लाभधारक आहोत. पण ही प्रक्रिया अतिशय सुलभ आणि सुटसुटीत केली तर सर्वांनाच हवी आहे. 

masr _1  H x W: 
 
 
काही देशांमध्ये आर्थिक व्यवहारांवर विशिष्ट कर लावून ही प्रक्रिया सुलभ करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. ही प्रक्रिया अगदी सोपी करण्याचा प्रस्ताव देशासमोर आहे. या पद्धतीचं नाव आहे बँक व्यवहार कर. ही पद्धत सध्याच्या करपद्धतीतले सर्व दोष काढून टाकेलच पण सरकारच्या तिजोरीत चांगला महसूलही जमा करू शकेल. ही पध्दत मान्य केली की बँक व्यवहार कर हा एकमेव कर नागरिकांच्या आयुष्यात असेल. बँकेतून ज्याच्या नावे आणि जेवढे पैसे क्रेडीट होतील, त्याच्याकडून एक िंकवा दोन टक्के कर आपोआप कापला जाईल. या कराचं त्याच क्षणी केंद्र, राज्य, स्थानिक स्वराज्य संस्था असं विभाजन होऊन संबंधित रक्कम त्या त्या संस्थांच्या खात्यात जमा होईल. बँिंकगच्या माध्यमातून क्रेडीट हिस्ट्री तयार होणार असल्याने आणि इतर कोणत्याही कराचा भार नसल्याने करदात्याला त्याचं ओझंही वाटणार नाही. या पध्दतीमुळे विनाकारण वाढलेल्या कर भरण्याच्या गुंतागुंतीपासून नागरिकांची सुटका होईल. हा कर प्रमाणबद्ध असल्याने भेदभाव होणार नाही. जेवढा व्यवहार होईल, त्या प्रमाणातच कर लागेल. या प्रक्रियेमुळे देशातला प्रत्येक नागरिक स्वाभिमानी करदाता होऊ शकेल. देशाला पडणारी अधिक कराची गरज अगदी छोट्या बदलाने भागवता येईल. अर्थातच अशा प्रकारचा बदल अंमलात आणण्यापुर्वी देशव्यापी चर्चा घडवून आणावी लागेल. त्याचे फायदे आणि तोटे समजून घ्यावे लागतील.
 
 
Appeal