मंदीतही लाभाचं गणित

    दिनांक :23-Mar-2020
|
भारत आणि चीनमध्ये मोठा व्यापार आहे. त्यात आपण नव्वद अब्ज डॉलर किंमतीच्या मालाची आयात करतो तर 15 अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात करतो. आपण बनवत असलेल्या औषधांसाठी लागणारा 85 टक्के कच्चा माल आपण चीनकडून आयात करतो. खरं तर अशा बाबतीत कोणत्याही एका देशावर अवलंबून राहणं चुकीचंच आहे. कोरोना व्हारसच्या आताच्या साथीचं उदाहरण घ्या. कोरोना व्हायरस चीनमध्ये आला असताना पॅरासेटॅमलच्या गोळ्या भारतात 40 टक्क्यांनी महागल्या. भारताला औषध निर्यातीतलं आपलं स्थान कायम ठेवायचं असेल, तर त्यासाठी पर्यायी कच्च्या मालाची व्यवस्था करणं आवश्यक आहे. चीनचा आक्रमकपणा आणि त्याला जगाची महासत्ता होण्याची झालेली घाई पाहता आपण चीनकडील आयातीला पर्याय निर्माण केला पाहिजे. चीनकडून आपण मोबाईलचे सुटे भाग, इलेक्टॉनिक्स वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात करतो. अगदी 85 टक्क्यांपर्यंत आयात केली जाते. 

artha_1  H x W: 
 
 
कोरोना व्हायरसमुळे आता चीनमधून आयात होणार्‍या वस्तू येईनाशा झाल्या आहेत. त्याचा परिणाम भारतातल्या उद्योगांवर झाला आहे. इलेक्टॉनिक्स वस्तूंसाठी लागणार्‍या कच्च्या मालासाठीही आपण दक्षिण कोरिया, जपान हे पर्याय समोर ठेवायला हवेत, हा धडा कोरोना व्हायरसनं घालून दिला आहे. कोरोना समस्येमुळे सध्या भारतीय उद्योगांना अडचणीतून जावं लागत असलं तरी ही तात्पुरती अडचण असून दीर्घकाळाचा विचार करता त्यातून आपलाच फायदा होणार आहे. फक्त त्यासाठी चीनच्या आयातीला पर्याय शोधावा लागेल. विशेषतः कापड उद्योगाला यातून मोठी संधी आहे. भारतीय कापड उद्योग आता नवीन पर्याय शोधू शकतील. टीव्ही, वातानुकुलित यंत्रं, फ्रीज, एलईडी आदींच्या किंमती पाच ते दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. याचं कारण त्यासाठी लागणारे सुटे भाग आपण चीनमधून आयात करतो; परंतु त्यातून धडा घेऊन अशा सुट्या भागांची निर्मिती करण्यासाठीचे उद्योग भारतात सुरू करण्याची संधी असल्याचं तज्ज्ञ सांगतात. चीन हा भारताला कांदा निर्यातीत स्पर्धक देश आहे. भारतात आता नवीन कांदा बाजारात येत असताना कांद्याचे भाव उतरले आहेत. अशा वेळी नेमका कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यानं चीनमधून जागतिक बाजारात कांद्याची निर्यात होत नाही. त्याचा फायदा उठवण्याची आणि भारतातल्या कांद्याच्या दरात स्थिरता आणण्याची मोठी संधी आपल्याला आहे. कोरोनाचा आता कांद्यालाही झटका बसला आहे.
Appeal