परिस्थिती नियंत्रणात न आल्यास आयपीएल रद्द?

    दिनांक :23-Mar-2020
|
नवी दिल्ली,
कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता, बीसीसीआयने आपल्या सर्व महत्वाच्या स्पर्धा काही काळासाठी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलत सर्व भारतीय खेळाडूंनीही या काळात स्वतःला घरामध्ये बंदिस्त करत आपल्या चाहत्यांना प्रशासकीय यंत्रणांना मदत करण्याचा सल्ला दिला आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार, परिस्थिती नियंत्रणात न आल्यास बीसीसीआय वर्षाच्या अखेरीस छोटेखानी स्पर्धा खेळवू शकते. मार्च महिन्याच्या अखेरीस यावर निर्णय घेतला जाणार आहे, मात्र तोपर्यंत परिस्थिती नियंत्रणात न आल्यास बीसीसीआय यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द करण्याची शक्यता आहे.

korona _1  H x  
 
आयपीएल स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे, मात्र खेळाडूंची सुरक्षा अधिक महत्वाची असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने याआधीच स्पष्ट केले आहे. बीसीसीआयचे उच्च अधिकारी दर आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेत आहेत. २४ मार्चरोजी आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलचे अधिकारी आणि सर्व संघमालक यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा होणार आहे. या बैठकीत आयपीएलच्या भवितव्याबद्दल निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयानेही १५ एप्रिलनंतर परिस्थितीचा अंदाज घेऊन आयपीएलला परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे.
 
 
Appeal