तीन तासात आढळले सहा नवे रुग्ण, महाराष्ट्रात आता १२२ कोरोनाग्रस्त

    दिनांक :25-Mar-2020
|
मुंबई,
राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२२ वर पोहचली आहे. मुंबई पाच तर ठाण्यात १ रुग्ण आढळल्याने ११६ वरुन ही संख्या १२२ वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. तीन तासात ६ नवे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या १२२ वर पोहचली आहे.
co_1  H x W: 0
 
सोमवारपर्यंत महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ९७ वर होती. मंगळवारी सकाळी ४ नवे रुग्ण आढळल्याने ती १०१ वर पोहचली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही संख्या १०७ वर पोहचली. आता नऊ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली. त्यानंतर सहा नवे रुग्ण आढळले आहेत ज्यामुळे ही संख्या १२२ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे. तरीही घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
 
 
दरम्यान आजच उद्धव ठाकरे यांनीही जनतेला हेच आवाहन केले की घराबाहेर पडू नका. स्वतःला सांभाळा. मिळालेला वेळ हा कुटुंबीयांसोबत घालवा. लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा थांबणार नाहीत हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.