पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला डिस्चार्ज

    दिनांक :25-Mar-2020
|
पुणे,
महाराष्ट्रातील पहिल्या कोरोनाबाधित दाम्पत्याला आज बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयातून त्यांना ॲम्ब्युलन्समधून पोलिस बंदोबस्तात घरी सोडण्यात आलं. कोरोनाची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्याने हे दाम्पत्य आता ठणठणीत होऊन आज म्हणजेच गुढीपाडव्याला आपल्या घरी परतले आहे. हे दाम्पत्य परतताना रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला, तर दाम्पत्याने हात जोडून त्यांचे आभार मानले.

discharge_1  H  
 
दरम्यान पुढील 14 दिवस या दाम्पत्याला स्वत:ला होम क्वॉरन्टाईन करुन घ्यावं लागणार आहे. जेणेकरुन लोकांच्या मनात भीतीचं वातावरण राहणार नाही किंवा यांना लोकांकडून कोणता त्रास होणार नाही. कोरोना मुक्त झालेल्यांना शेजारच्यांनी किंवा सोसायटीमधल्या लोकांनी विरोध केला तर पोलीस तिथे असावेत, असा आरोग्य विभागाचा प्रोटोकॉल आहे. त्यानुसार पोलीस बंदोबस्तात दाम्पत्य आपल्या घरी परतलं