संचारबंदीत बाहेर पडणार्‍यांवर कठोर कारवाई करणार : जिल्हाधिकारी

    दिनांक :25-Mar-2020
|
- बाहेरून जिल्ह्यात आलेले सर्वच निरीक्षणाखाली
- ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकार्‍यांची माहिती

गडचिरोली,
संचारबंदी लागू करूनही विनाकारण बाहेर पडणार्‍यांची सं‘या निदर्शनास येत आहे. यामुळे प्रशासन व पोलिस यंत्रणेला कठोर पाऊले उचलत कारवाई करावी लागेल, अशा सूचना जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी तहसिलदार यांना व्हीसीद्वारे दिल्या आहेत. अकारण कोणताही व्यक्ती अथवा वाहने रस्त्यावर नको आहेत. संचार बंदीनंतरही कोणी ऐकत नसेल तर पोलिसांना व प्रशासनाला कारवाई करण्याची तरतूद कलम 144 तसेच साथरोग नियंत्रण व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत आहे.
 
 
sb_1  H x W: 0
 
करोना संसर्गाच्या धर्तीवर फक्त आवश्यक सेवांसाठी फिरण्याची परवानगी असताना काही नागरिक अकारण फिरत असतील तर त्यांनी या संसर्गाची गांभीयर्ता लक्षात आणून देणे गरजेचे आहे. स्वत: व स्वत:च्या कुटुंबासाठी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे ही अपेक्षा आहे. अशांना जिल्हाधिकारी यांनी याबाबत प्रसिद्धी पत्रकाद्वारे घरात राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. मंगळवारी तहसिलदार, नगर परिषद मु‘याधिकारी व सर्व तालुका पोलिस अधिकारी यांच्याशी संयुक्त झालेल्या ऑनलाईन बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषद मु‘य कार्यकारी अधिकरी डॉ. विजय राठोड, अति. पोलिस अधीक्षक डॉ. मोहित गर्ग आदी विभाग प्रमुख उपस्थित होते.
 
 
करोना संसर्ग साखळीतील आताची परिसिथती निर्णायक स्तरावर आलेली असताना नागरिकांनी याबाबत गांभीर्याने संसर्ग साखळी समजून घेणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी यांनी म्हटले आहे. जिल्ह्यातील परिस्थिती चांगली असताना आता आपण सहकार्य केले नाही, तर प्रशासन किंवा पोलिस तसेच आरोग्य विभागही संसर्ग रोखू शकणार नाही. जगातील संसर्ग झालेल्या देशांमधील अनुभवांवरून केवळ नागरीकच ही संसर्ग साखळी तोडू शकतात हा अनुभव आहे. या प्रकि‘येत कोणी अडचण निर्माण करून संसर्गास चालना देत असेल तर त्यासाठी प्रशासन जनतेच्या हितासाठी कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितले. गावस्तरावर पोलिस पाटील तसेच गा‘म पाटिल यांची मदतही घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी केल्या.