विदेशातील 14 जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

    दिनांक :25-Mar-2020
|
- चंद्रपुरातील मस्जिदमध्ये टाकली धाड
- वन अकादमीमध्ये होम क्कारंटाईन
 
तभा वृत्तसेवा
 
चंद्रपूर,
महानगरातील तुकुम परिसरातील एका मस्जिदमध्ये रशियातल्या तिर्किस्तानातील 11, दिल्ली, ओडिसा आणि केरळ येथील प्रत्येकी एक असे एकूण 14 व्यक्ती वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार रामनगर पोलिसांनी बुधवारी धाड टाकून 14 जणांना ताब्यात घेतले. त्यांना वन अकादमी येथे होम क्वॉरेंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे.
 
 
police_1  H x W
 
कोरोनाचा संसर्ग पसवू नये म्हणून प्रशासनाच्या वतीने कठोर अंमलबाजवणी केली जात आहे. विदेशातून आलेल्यांनी स्वत: माहिती देण्याचे आवाहन केले. मात्र, 11 तिर्किस्तानी आणि दिल्ली, ओडिसा व केवळ येथील प्रत्येकी एक असे एकूण 14 व्यक्ती मस्जिदमध्ये असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकला. या 14 व्यक्तींना शहरातील वन अकादमी येथे होम क्वॉरेंटाइनमध्ये ठेवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
 
 
मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. देशासह राज्यात दिवसागणिक कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. सर्व जिल्हा, राज्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. विदेशातुन आलेल्या नागरिकांनी स्वत: पुढाकार घेऊन प्रशासनाकडे नोंद करावी आणि होम क्वॉरेटाइनमध्ये राहावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून वारंवार देण्यात येत आहेत.