अमेरिकन स्क्रीन रायटर टॅरेन्स मॅकनली कालवश

    दिनांक :25-Mar-2020
|
न्यूयॉर्क,
कोरोना व्हायरसमुळे जगभरात दहशतीचे वातावरण पसरले असतानाच अमेरिकन स्क्रीन रायटर टॅरेन्स मॅकनली यांचे कोरोना विषाणूच्या संक्रमणाने निधन झाले. फ्लोरिडा येथील एका रुग्णालयात त्यांनी मंगळवारी अखेरचा श्वास घेतला. प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या अॅमी आणि टोनी पुरस्कारांनी त्यांचा सन्मान करण्यात आला होतो. टॅरेन्स यांच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले की, टॅरेन्स यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाला होता. मात्र त्यांनी या आजारावरही मात केली होती.

terrence mcnally_1 & 
 
सोशल मीडियावर टॅरन्स यांच्या निधनाची बातमी कळताच जगभरातून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. ब्रिटीश अभिनेता जेम्स कॉर्डनने टॅरेन्स यांच्या निधनावर दुःख व्यक्त करत म्हटले की, 'ते खरंच जेन्टलमन होते. थिएटरसाठीचे त्यांचे प्रेम पाहण्यासारखे होते. त्यांची नेहमीच आठवण येईल.'
 
टॅरेन्स यांना the bard of American theater असेही म्हटले जायचे. आयुष्यातील ६० वर्ष त्यांनी थिएटरला दिली. त्यांचे प्ले, ऑपेरा आणि म्युझिक शो जगभरात प्रसिद्ध होते. याशिवाय ते प्रेम, एड्स, होमोफोबिया अशा विषयांवरही लिखाण करायचे. त्यांचे लव्ह वैलोर कम्पॅशन, मास्टर क्लास, बुक किस ऑफ द स्पायडरवुमन, रॅगटाइम हे प्ले आजही प्रसिद्ध आहेत.