लॉकडाउनला कलाकारांचा पाठिंबा

    दिनांक :25-Mar-2020
|
मुंबई,
कोरोनामुळे देशासमोर मोठे संकट उभे राहिले आहे. या महारोगाचा संसर्ग इतक्या झपाट्याने होत आहे की, त्याची साखळी तोडण्याशिवाय देशासमोर कोणताही पर्याय नाही. त्यामुळे पुढील २१ दिवस संपूर्ण देश लॉकडाउन करण्यात येणार आहे, अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. मोदींच्या या निर्णयाला बॉलिवूड कलाकारांनी पाठिंबा दर्शविला आहे. इतका मोठा निर्णय घेण्यासाठी खरच हिंमत लागते, असे म्हणत कलाकारांनी मोदींना साथ दिली आहे.
 

celebrities_1  
 
 
ट्विटरच्या माध्यमातून कलाकारांनी हा पाठिंबा दर्शविला आहे. ‘हा निर्णय घेण्याची खूप मोठी गरज होती आणि त्यासाठी खरच हिंमत लागते. आपण थोडा उशिरा हा निर्णय घेतला पण याला आमचा पूर्ण पाठिंबा आहे’, असे गायक-संगीतकार विशाल दादलानी ट्विटरवर म्हणाला.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
अनुपम खेर, सुमीत राघवन, तापसी पन्नू, रेणुका शहाणे, रंगोली चंडेल यांनीसुद्धा ट्विटरच्या माध्यमातून २१ दिवस लॉकडाउनला पाठिंबा दिला आहे. कोरोना हा आगीसारखा हा पसरत चालला आहे. त्यामुळे एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे, तो म्हणजे घरातच राहणं. देशाच्या भल्यासाठी देशातील जनतेच्या भविष्यासाठी ही घोषणा केली आहे. हा लॉकडाउन जनता कर्फ्यूसारखा नसेल. अत्यंत कडक पद्धतीनं लागू केला जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.