केम्ब्रिज इंटरनॅशनल बोर्डाच्या परीक्षा रद्द

    दिनांक :25-Mar-2020
|
दुबई,
केंम्ब्रिज इंटरनॅशनलने आयजीसीएसई बोर्डाच्या मे-जून मधील दहावी, अकरावी आणि बारावीच्या देशातल्या आणि देशाबाहेरच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यासंदर्भातील माहिती बोर्डाने संकेतस्थळावर जाहीर केली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

exams_1  H x W: 
 
 
केम्ब्रिज बोर्डाने परिपत्रकात असे म्हटले आहे की 'कोणत्याही देशातल्या मे-जून सिरीजमधील आंतरराष्ट्रीय बोर्डाच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय आम्ही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेत आहोत.' केम्ब्रिज बोर्डानुसार, केवळ १०-१५ टक्के शाळांच्या मे-जून परीक्षा असतात.
 
विद्यार्थ्यांना त्यांच्या अंतर्गत चाचण्यांवरून गुण आणि प्रमाणपत्र देण्यात यावेत, असे निर्देश शाळांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्षभर झालेल्या परीक्षांमधील गुणांची सरासरी काढून त्यानुसार गुण देण्यात येणार आहेत. याशिवाय बोर्डाने ओ लेव्हल, केम्ब्रिज एआयसीई (Advanced International Certificate of Education) डिप्लोमा आणि केम्ब्रिज प्री-यू परीक्षादेखील रद्द केल्या आहेत.