पहिल्या टप्प्यातील जणगणना, एनपीआर प्रक्रिया ढकलली पुढे

    दिनांक :25-Mar-2020
|
नवी दिल्ली,
कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून सुरु होणाऱ्या २०२१ च्या जनणगणनेचा पहिला टप्पा तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीचे (एनपीआर) अद्यावतीकरणही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. केंद्रीय गृहखात्याने याची माहिती दिली आहे.
 

census _1  H x
 
 
देशभरात १ एप्रिल २०१९ पासून जणगणना (२०२१) ची प्रक्रिया सुरु होऊन ३० सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहे. मात्र, आता यातील पहिला टप्पा पुढे ढकलण्यात आला आहे. या प्रक्रियेदरम्यान, जनतेला विविध प्रकारचे ३१ प्रश्न विचारण्यात येणार आहेत. रजिस्ट्रार जनरल अथवा जणगणना आयुक्तांची याची अधिसूचना काढली होती.