केंद्रीय विद्यालयांमध्ये पहिली ते ८ वी विद्यार्थी होणार प्रमोट

    दिनांक :25-Mar-2020
|
नवी दिल्ली,
देशातील सर्व केंद्रीय विद्यालयांमधील पहिली ते आठवीतील सर्व विद्यार्थ्याना पुढच्या वर्गात प्रमोट केले जाणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असो वा नसो, सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाणार आहे. एका अधिकाऱ्यांनी सांगितले की केंद्रीय विद्यालय संघटनेने हा निर्णय घेतला की पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाशिवाय परीक्षा देता आली नसेल त्या सर्व विद्यार्थ्यांना प्रमोट करून वरच्या वर्गात पाठवले जाणार आहे. करोना व्हायरसच्या पृष्ठभूमीवर ३१ मार्चपर्यंत केंद्रीय विद्यालये आणि अन्य सर्व केंद्रीय विद्यालयांच्या परीक्षा आणि वर्ग स्थगित केले आहेत.
 
kendra _1  H x
 
सर्वात आधी उत्तर प्रदेश या राज्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याची घोषणा केली होती. यूपीनंतर महाराष्ट्रातही हा निर्णय घेण्यात आला. हरयाणातही हा निर्णय घेण्यात आला. मध्य प्रदेशात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या मासिक आणि अर्धवार्षिक परीक्षांच्या आधारावर मूल्यांकन करून वरच्या वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. गुजरातमध्ये पहिली ते नववीपर्यंतच्या आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रमोट केले जाणार आहे.