कोरोना रोखण्यासाठी अकोला महापालिका अग्रेसर; एकही पॉझिटिव्ह रुग्ण नाही

    दिनांक :25-Mar-2020
|
अकोला,
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी अकोला महापालिकेद्वारे विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती भाजपा जिल्हाध्यक्ष व आमदार रणधीर सावरकर यांनी दिली आहे. महापौर अर्चना मसने आणि आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत बैठक घेत त्यांनी हे दिशानिर्देश दिले आहे. या उपाययोजनांचे नागरिकांनी पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी घरात राहण्याची गरज आ. रणधीर सावरकर यांनी व्यक्त केली. 

corona_1  H x W 
 
कोरोना संदर्भात तक्रारी घेण्याकरिता मनपा कार्यालय येथे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. महापालिकेद्वारे नागरिकांना समुपदेशन व तक्रारीकरिता कंट्रोल रूम व टोल फ्री क्र. 18002335733/0724-2434412 कार्यान्वित करण्यात आली आहे. कोरोना संभाव्य प्रादुर्भाव शेधण्याकरिता 40 पथकांचे गठन करण्यात आले आहे व शहरातील एकुण 1556 नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. प्रभागनिहाय 10 फॉगिंग मशीनद्वारे व 40 पंपाद्वारे जंतुनाशक फवारणी व धुवारणी सुरू आहे. महापौर व आयुक्त यांच्याद्वारे शहरातील भाजी विक्रेते व मेडिकल स्टोर यांना भेटी देऊन दुकानासमोर गर्दी न करणे व आपसात कमीत कमी 1 मीटर अंतर ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
 
आकोट फैल पोलिस स्टेशन समोर मनपा शाळा क्र. 6 येथे बेघर निवारा सुरू करून देण्यात आला आहे. त्यामध्ये शौचालय, बाथरूम, वीज, पाणी व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील जागरूक नागरिक, लोकप्रतिनिधी, पोलिस यांना सुद्धा असे बेघर व्यक्ती रस्त्यावर आढळल्यास त्यांनी सुद्धा वरील पत्यावर त्यांना पाठवावे व 9881331098, 7709377650, 7709820966, 9763561842, 9096187953 आदी क्रमांकावर संपर्क साधावा. परदेशातून शहरात आलेल्या होम क्वॉरंटाईनमध्ये असेल्या एकूण 96 नागरिकांमधून 14 दिवस पूर्ण झाले असल्याने 44 नागरिक होम क्वॉरंटाईनमधून बाहेर आले आहे. सध्या 52 नागरिक होम क्वॉरंटाईन असून, दररोज मनपाची पथके त्यांच्या संपर्कात आहे व आतापर्यंत संपूर्ण जिल्ह्यातून एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेला नाही.