महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले होते, कोरोनाचे 21 दिवसांत जिंकायचे

    दिनांक :25-Mar-2020
|
- पंतप्रधानांचा निर्धार
  
modi_1  H x W:
 
नवी दिल्ली, 
महाभारताचे युद्ध पांडवांनी 18 दिवसांत जिंकले होते. आता आपल्यालाही 21 दिवसांत कोरोनाविरोधातील युद्ध जिंकायचे आहे, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बुधवारी व्यक्त केला.
 
 
 
देशभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्याने पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर आज पहिल्यांदाच आपला मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील जनतेशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी मोदी म्हणाले की, महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले गेले होते. आज कोरोनाविरोधातील युद्ध संपूर्ण देशातच नव्हे, तर जगात लढले जात आहे. आपल्याला मात्र हे युद्ध 21 दिवस जिंकावे लागणार आहे आणि त्याच दिशेने आपला प्रयत्न राहणार आहे. महाभारताच्या युद्धात भगवान श्रीकृष्ण महारथी व सारथी देखील होते. आज 135 कोटी महारथींच्या जोरावर आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. यात काशीवासीयांची देखील मोठी भूमिका असेल.
 
 
कोरोनाचा फैलाव पाहता त्याच्याशी लढण्यासाठी देशभरात व्यापक तयारी केली जात आहे. सर्वांना या काळात घरातच राहाणे गरजेचे आहे. हाच या आजापासून वाचण्याचा चांगला उपाय आहे. कोरोनाच्या संक‘मितांची जागतिक सं‘या एका लाखावर गेली आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.