कोरोनाच्या संकटाची तीव्रता कमी होवो; राज ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा

    दिनांक :25-Mar-2020
|
मुंबई,
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटवरुन गुढीपाडव्यानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी होऊन पूर्ण सर्वत्र आरोग्याचे, भरभराटीचे वातावरण येवो, अशा सदिच्छा राज यांनी ट्विट करुन दिल्या आहेत. राज यांनी ट्विटवर अकाऊटंवरुन एक ऑडिओ मेसेज पोस्ट केला आहे.
raj_1  H x W: 0 
 
“वसुधैव कुटुम्बकम’ अर्थात वैश्विक कुटुंबाच्या ह्या काळात संपूर्ण जग एकत्रितपणे एका संकटाशी झुंज देत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, हीच सदिच्छा”, असं ट्विट राज यांनी केलं आहे. तसेच त्यांनी ट्विटबरोबर एक ऑडिओ शेअर केला असून त्यामध्ये पसायदानातील ‘दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।’ या ओळी आहेत.
 
 
 
‘वसुधैव कुटुम्बकम’ अर्थात वैश्विक कुटुंबाच्या ह्या काळात संपूर्ण जग एकत्रितपणे एका संकटाशी झुंज देत आहे. ह्या गुढीपाडव्याच्या निमित्ताने ह्या संकटाच्या छायेची तीव्रता कमी कमी होत सर्वत्र पुन्हा एकदा आरोग्याचं, भरभराटीचं वातावरण येवो, हीच सदिच्छा. ‘कोरोना’चे सावट गडद आहे त्यामुळे ह्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘गुढीपाडवा मेळावा’ रद्द करत आहोत, अशी घोषणा काही दिवसांपूर्वी ट्विटवरुन मनसेने केली होती.