संकटाचा एकत्रित सामना करण्याची गरज : डॉ. मोहनजी भागवत

    दिनांक :25-Mar-2020
|
नागपूर,
सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशा परिस्थितीत खबरदारीचा उपाय म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी स्वयंसेवक प्रत्येक आवश्यक ती मदत करण्यासाठी तयार असल्याचे म्हटले आहे. प्रतिपदेच्या भाषणादरम्यान ते बोलत होते.
 
mohan_1  H x W:
 
शासन आणि प्रशासनाच्या प्रत्येक आवश्यक त्या मदतीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक तयार आहेत. देशातील नागरिकांच्या मदतीसाठी सर्व आवश्यक त्या वस्तूंचा पुरवठा करण्याचे काम पोलिस आणि प्रशासनाच्या मदतीने स्वयंसेवकांनी सुरू केले आहे. आपण सर्वांनी यावेळी नियमांचे कठोरपणे पालन केले पाहिजे, असे डॉ. मोहनजी भागवत यावेळी म्हणाले.
 
 
 
संपूर्ण समाजाद्वारे अनुशासनाचं पालन केले पाहिजे. औषधे आणि अन्य आवश्यक सेवा सर्वांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. कोरोनाविरोधातील या युद्धातील प्रमुख बाब म्हणजे सोशल डिस्टंसिंग आहे. ही आपल्या समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. यावरूनच आपण कोरोनावर विजय मिळवू. हे युद्ध आपल्याला एकत्रित लढायचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
 
सध्या देशातील कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या ५५० च्या जवळ पोहोचली आहे. तर ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशाला संबोधित केले. तसेच पुढील २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिल पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केले आहे.