शेअर बाजाराची 1862 अंकांची मोठी कमाई

    दिनांक :25-Mar-2020
|
मुंबई,
कोरोनाविरोधातील लढा जगभरातच तीव्र होत असल्याने भारतातही मोदी सरकारने लॉकडाऊनसह आर्थिक आघाडीवर काही ठोस पावले उचलली आहेत. याचे सकारात्मक पडसाद आज बुधवारीही मुंबई शेअर बाजारावर दिसून आले असून, आज शेअर बाजाराने 1862 अंकांची मोठी कमाई केली.
 

sensex_1  H x W 
 
 
21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. उत्साही गुंतवणूकदारांनी आज सकाळपासूनच खरेदीवर भर दिला होता. सकाळची सुरुवात 1600 अंकांच्या कमाईने झाल्यानंतर दुपारी बाजारात काही प्रमाणात घसरणही झाली. मात्र काही कंपन्यांच्या शेअर्सला चांगला भाव मिळाल्याने, बाजार पुन्हा कमाईकडे वळला. दिवसभराच्या उलाढालीनंतर शेअर बाजाराचा निर्देशांक 1861.75 अंकांच्या कमाईसह 28,535.78 या स्तरावर बंद झाला.
 
 
आजच्या व्यवहारात रिलायन्स, एचडीएफसी, आयसीआयसीआय, कोटक बँक, मारुती, टायटन आणि अ‍ॅक्सिस बँक यासारख्या कंपन्यांना फायदा झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीनेही 516.80 अंकांची कमाई केली. दिवसभराच्या व्यवहारानंतर निफ्टी 8317.85 या स्तरावर बंद झाला.