प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची बाधा

    दिनांक :25-Mar-2020
|
लंडन,
जगभरात वेगाने फैलावणाऱ्या करोनाच्या संसर्गाने ब्रिटनच्या राजघराण्यातही शिरकाव केला आहे. प्रिन्स चार्ल्स यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे समोर आले असून राजघराण्यात मोठी खळबळ उडाली आहे. प्रिन्स चार्ल्स आधीपासूनच स्कॉटलंडमध्ये आयसोलेशनमध्ये आहेत.

prince_1  H x W 
 
काही दिवस आधी प्रिन्स चार्ल्स यांची मोनॅकोचे प्रिन्स अल्बर्ट यांनी भेट घेतली होती. त्यांनाही कोरोनाची बाधा झाली असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाले आहे. क्लेरेंस हाऊसचे प्रवक्त्यांनी सांगितले की, प्रिन्स ऑफ वेल्स यांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे वैद्यकीय तपासणीत समोर आले आहे. त्यांच्यात कोरोनाची थोडी लक्षणे आढळली असली तरी त्यांची प्रकृती चांगली आहे. मागील काही दिवसांपासून ते घरातूनच काम करत आहेत. शासकीय आणि वैद्यकीय सल्ल्यानुसार प्रिन्स चार्ल्स यांना स्कॉटलंडच्या बालमोरल राजवाड्यात आयसोलेशनमध्ये आहेत.
 
प्रिन्स चार्ल्स यांच्या पत्नी कॅमिला यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्यांना बाधा झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राणी एलिझाबेथ यांना याआधीच बर्मिंघम पॅलेसहून विंडसर येथील राजवाड्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोनाची बाधा झाल्यामुळे ४२२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, आठ हजारहून अधिकजणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.