यवतमाळ जिल्हावासींनी प्रशासनासोबत उभारली सहकार्याची गुढी

    दिनांक :25-Mar-2020
|
यवतमाळ,
‘कोरोना’ या विषाणूने जगभरात थैमान घातले असताना भारतीयांनी नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत या विषाणूला वेळीच थोपवून धरले आहे. संपूर्ण देशातील नागरिक आरोग्य विभाग, पोलिस विभाग व प्रशासनाच्या पाठीशी उभे असून यवतमाळ जिल्हावासींनी ‘कोरोना’च्या लढाईत प्रशासनासोबत सहकार्य करणार असल्याची ग्वाही देत शांततेत गुढी उभारली आहे.
 
dasa _1  H x W: 
 
यवतमाळ जिल्ह्यात हिंदू नववर्षानिमित्त साजरा होणारा पहिला सण गुढीपाडवा पहिल्यांदाच अत्यंत शांततेत पार पडला. एरवी एखादा सण अथवा उत्सव म्हटले की, बाजारातली उसळणारी गर्दी सर्वत्र असते. मात्र या गुढीपाडव्याला ती कुठेही दिसली नव्हती. आवश्यक साहित्य खरेदीची परवानगी असतानाही नागरिकांनी पोलिसांवर कुठेही ताण येणार नाही याची दक्षता घेतली. वने, भूकंप व पर्यावरण मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनीही नागरिकांना घरीच शांततेत गुढी उभारण्याचे आवाहन केले होते.
 
 
गुढीपाडव्यापासून माहूरगडावर चैत्र नवरात्रीस (शाकंभरी नवरात्र) सुरुवात होत असते. या निमित्ताने देवीचे पूर्ण शक्तीपीठ असलेल्या माहूरगडावर विविध धार्मिक कार्यक‘मांचे आयोजन करण्यात येत असते. मात्र यावर्षी हे चैत्रनवरात्र केवळ मानाची पूजा करून सुरू झाले आहे. 14 वर्षांपासून यवतमाळ शहरात होणारा पाडवा पहाट हा कार्यक‘म यावर्षी रद्द करण्यात आला. तर जिल्ह्यातील अनेक शेतकर्‍यांकडची सालगडी ठेवण्याची परंपराही काही प्रमाणात खंडित झाली आहे.