करा स्वभावात, मानसिकतेत बदल

    दिनांक :07-Mar-2020
|
 
 
यश या शब्दाची व्याख्या व्यक्तिगणिक बदलत जाते. आयुष्यातली ध्येयं गाठणं, उद्दीष्ट पूर्ण करणं म्हणजे काहींसाठी यश असू शकतं. एखाद्यासाठी साध्याशा क्रीडा स्पर्धेतल्या विजयापुरती यशाची संकल्पना मर्यादित असू शकते. आपलं जीवन अनंत अडचणी आणि अडथळ्यांनी भरलं आहे. त्यामुळे सर्व क्षमतेनिशी मैदानात उतरून प्रयत्न करत राहणं ही यशस्वी होण्याची गुरूकिल्ली ठरू शकते. अर्थात यश मिळवण्यासाठी स्वभावात, मानसिकतेत काही बदल करावे लागतात. त्याविषयी... 
 
pba_1  H x W: 0
 
  • नकारात्मकता सोडून इच्छाशक्ती वाढवायला हवी. काही सवयींमुळे यश हुलकावणी देत आहे का, हे आपण लक्षात घ्यायला हवं. तसं असेल तर या सवयी सोडून द्यायल्या हव्यात.
  • आरोग्यदायी जीवनशैली अवलंबवा. आहाराच्या चुकीच्या सवयी, सतत बसून राहणं या गोष्टी सोडून द्या. व्यायामाची सवय लावा. तेलकट पदार्थ वर्ज्य करा. आरोग्य उत्तम असेल तर आपण आयुष्यात काहीही साध्य करू शकतो
  • प्रत्येक व्यक्तीला आणि गोष्टीला होकार देऊ नका. अवघडलेपणामुळे आपण नकार देऊ शकत नाही. यामुळे यश आपल्यापासून लांब जाऊ शकतं. परिणामी, नकाराला आपलं सामर्थ्य बनवा.
  • विशिष्ट मानसिकतेतून बाहेर पडा. ही मानसिकता पुढे जाऊ देत नाही. नव्या गोष्टी शिका. नव्या आव्हानांचा सामना करा.
  • एकाच वेळी विविध बाबी हाताळू नका. सर्वगुणसंपन्न होण्याचा प्रयत्न करू नका. आयुष्याचं एकमेव उद्दीष्ट ठरवा आणि ते साध्य करण्याचा प्रयत्न करा.
  • कोणतीही कारणं देऊ नका. अपयश आलं तरी घाबरून जाऊ नका. सतत रडत बसू नका.
  • प्रत्येक परिस्थितीवर आपलं नियंत्रण हवं, असा अट्टाहास बाळगू नका.
  • या जगात कोणीही सर्वोत्तम नाही. तुम्हीही तसे होऊ शकणार नाहीत, हे लक्षात घ्या. सदैव सर्वोत्तम होण्याचा ध्यास बाळगू नका.
  • मोठी स्वप्नं बघा. एखादी गोष्ट आपल्याला जमणार नाही, असा विचार सोडून द्या. अंथरूणाबाहेर पाय पसरायला शिका.