देशाला स्वयंपूर्ण करण्यासाठी एक संकल्प

    दिनांक :24-Apr-2020
|
 स्वदेशी जागरण मंचचा आज निर्धार दिन
 
नागपूर, 
सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने आपण सारेच संकटात सापडलो आहोत. संपूर्ण देशात टाळेबंदी लागू करण्यात आली असल्याने सर्व देशी उद्योग, कारखाने बंद आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी संपूर्ण जगात सकारात्मक प्रयत्न करण्यात येत आहेत आणि भारतातही विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू आहेत. आपणा सर्वांच्याच प्रार्थनेने या संकटातून आपण नक्कीच लवकरात लवकर बाहेर पडू पण त्यानंतर आपल्याला आर्थिक संकटावरही मात करायची आहे. यासाठी आपण सर्वांनीच स्वदेशी वस्तूंचा उपयोग करण्याचा संकल्प करण्याची आवश्यकता आहे. म्हणूनच स्वदेशी जागरण मंचतर्फे 25 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 ते 6.40 पर्यंत स्वदेशी उत्पादनांचा वापरण्याचा संकल्प केला जाणार आहे.
 
स्वदेशी जागरण मंचच्या प्रत्येक कार्यकर्त्यांने आणि सर्व नागरिकांनी या काळात स्वदेशी उत्पादने वापरण्याचा संकल्प करायचा आहे. यासाठी कुणीही एकत्रित येण्याची गरज नाही. आपापल्या घरात राहूनच हा संकल्प करण्याचे आवाहन स्वदेशी जागरण मंचतर्फे करण्यात आले आहे. हा संकल्प करताना सामाजिक अंतराचे भान पाळणे आवश्यक आहे. कोरोना संकटावर मात केल्यानंतर आपल्या देशाला आर्थिक संकटाशीही सामना करायचा आहे. जागतिक पातळीवर टिकून राहण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आर्थिक बाजू सावरणेही अत्यावश्यक असून सर्व नागरिकांनी स्वदेशी वस्तूंची खरेदी केली तर आपले उद्योग अधिक यशस्वी होतील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशाला बलशाली आणि आर्थिक संपन्न करण्यासाठी सर्व नागरिकांनी स्वदेशी उत्पादनांचीच खरेदी केली तर हे यश सहज मिळणारे आहे. शिवाजी महाराजांच्या काळातही महाराजांच्या आदेशाप्रमाणे स्थानिक वस्तूंची खरेदी नागरिकांनी केल्यावर स्वराज्याचा महसूल वाढल्याचा इतिहास आहे. त्यामुळेच आज भारतीय नागरिकांनी भारतीय वस्तूंना महत्त्व देण्याची गरज कधी नव्हे इतकी आहे. त्यामुळेच स्वदेशी जागरण मंचतर्फे हा संकल्प दिन आयोजित करण्यात आला आहे.
 
swadeshi jagran manch_1&n
 
यात संध्याकाळी 6:30 वाजता आपल्या घरी कुटुंबासमवेत भारतमाता, छत्रपती शिवाजी महाराज अथवा दत्तोपंत ठेंगडी यापैकी सर्व किंवा उपलब्ध असतील ती छायाचित्रे लावून मालार्पण करून दिवा लावावा. ओंकार ध्वनी, देशभक्ती गीत, स्वदेशी गीत, धार्मिक गीत, भजन किंवा नामस्मरण करून सुरुवात करावी. चीनच्या विषाणूपासून मुक्ती/सुटका मिळावी याकरिता आपल्या इष्ट देवतेला साकडे घालावे आणि प्रार्थना करावी. जेणे करून आपली अंगभूत प्रतिकार शक्ती जागृत होऊन चिनी कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्याची क्षमता वृिंद्धगत होईल. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तसेच स्वदेशी जागरण मंचचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा उ‘ेख आपल्या वक्तव्यात अवश्य करावा. यानंतर सर्वांनीच आम्ही सर्वजण स्वदेशी वस्तूच वापरू, चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कार घालू, बेरोजगारी दूर करण्यासाठी आम्ही स्वदेशी अर्थव्यवस्थेचा अंगिकार करू आणि देशाची संपन्नता व पर्यावरणाच्या रक्षणासाठी सदैव प्रयत्नशील राहू, सोबतच जैविक, नैसर्गिक शेती तसेच मध्यम, लघू, कुटिर उद्योगांच्या वाढीसाठी प्रयत्नशील राहू, कटीबद्ध राहू, त्यांच्या वाढीकरिता त्यांचीच उत्पादने खरेदी करण्याचा सतत प्रयत्न करू, असा संकल्प करून भारत माता की जय! ही घोषणा द्यावयाची आहे.
 
चायनीज (कोरोना) विषाणूपासून बचाव करण्यासाठी आयुष मंत्रालयाद्वारा सूचीत योग, काढे, तुळस, गुळवेल (गिलोय), काळे मिरे व गो उत्पादने यांच्या उपयोगाच्या महत्त्वाबाबत चर्चा करावी. अशा प्रकारे 10 मिनिटांच्या वरील कार्यक‘मानंतर शेवटी ‘स्वदेशी वस्तूंचा स्वीकार, चिनी वस्तुंचा बहिष्कार, स्वदेशीचा स्वीकार करा, भारताला समृद्ध करा, भारत माता की जय’ आदी घोषणा द्याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर राष्ट्रगीत आणि शांतीमंत्राचे पठण करावे.
याशिवाय सर्व नागरिकानी हींींि://क्षेळपीुरवशीहळ.लेा या िंलकवर क्लिक करून स्वदेशी स्वयंसेवक व्हावे, असेही आवाहन स्वदेशी जागरण मंचतर्फे अ. भा. सहसंयोजक अजय पत्की आणि विदर्भ प्रांत संयोजक शिरीष तारे, सहसंयोजक प्रवीण मसे यांनी केले आहे.