चिमुकल्या मुलीची लाखोंची मदत

    दिनांक :24-Apr-2020
|
वाढदिवस आगळ्या पद्धतीने साजरा
 
नागपूर, 
वाढदिवसाला आपल्या मित्र-मैत्रिणी आणि घरच्या मंडळींनी एकत्र येऊन केक कापावा या निमित्ताने चमचमीत गोड खाद्यपदार्थ बनावे, रिटर्न गिफ्ट द्यावे, नाच-गाणे, खूप धमाल करावी असे प्रत्येकालाच वाटत असते. मात्र ह्या सगळ्या उत्सवपूर्ण आकर्षक गोष्टी नाकारून सध्यस्थितीचे कोविड-19 प्रादुर्भावाचे भान ठेवून दुसर्‍या वर्गात शिकणार्‍या मोलीने आपल्या वडिलांजवळ 20 एप्रिलला रोजी 8 वा वाढदिवस साजरा न करण्याचा हट्ट धरला आणि त्या पैशात कोरोना विषाणूशी लढणार्‍या अत्यावश्यक सेवेतील योद्ध्यांना सुमारे दोन लक्ष रुपयांचे नामांकित कंपनीचे हँड वॉश आणि सॅनिटायझर वितरीत करण्याचा संकल्प केला.


chimukli1_1  H

मोलीचे वडील महेशकुमार गोयल यांनी मोलीच्या संकल्पाला दाद दिली आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन, क‘ीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, खा. कृपाल तुमाने, आ. आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे आणि माजी नगरसेवक सुरेश जग्यासी यांच्या उपस्थितीत हँड वॉश आणि सॅनिटायझर वितरणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयापासून केला. या सर्व मान्यवरांनी चिमुकल्या मोलीच्या योगदानाचे भरभरून कौतुक केले.