नाकेबंदित वाहनासह ३ लाख ६२ हजारांची दारू जप्त

    दिनांक :25-Apr-2020
|
liquor _1  H x  
 
 
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
शहरातील पुलफैल परिसरातून सेवाग्रामकडे दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनासह ३ लाख ६२ हजार रुपयांची दारू जप्त करण्यात आली. या प्रकरणी शेख आदिल शेख कादिर (१९), शेख शमा शेख जमील (६३) दोन्ही रा. पुलफैल यांना अटक करण्यात आली.
 
 
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील पुलफैल परिसरातून सेवाग्राम कडे अवैध रित्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या आधारे सेवाग्राम रोडवर नाकेबंदी करत वाहनाची चौकशी केली असता एम. एच. ३२ ए. जे. २६५२ मध्ये या वाहनात गावठी दारू आढळून आली. पोलिसांनी चारचाकी वाहनसह 3 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई वरीष्ठ पोलिस अधिकऱ्यांच्या आदेशाने शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार योगेश पारधी यांच्या मार्गदर्शनात स.फौ. सुनील पाठक, मंगेश झामरे, निखिल वासेकर, संभाजी मुंडकर यांनी केली.