कोरोनाच्या परिस्थितीबाबत अशोक नेते यांची उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

    दिनांक :25-Apr-2020
|

ashok nete_1  H
 
 
गडचिरोली,
कोरोनामुळे गडचिरोली जिल्ह्यात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी शुक्रवारी गडचिरोलीचे निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली.
 
 
यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड, आंध्रप्रदेश व तेलंगण राज्यात कामासाठी गेलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी व त्यांना जिल्ह्यात परत आणून कारंटाईन मध्ये ठेवण्यात यावे. नागरिकांना रुग्णालयात जाण्यासाठी पर जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात यावी. विनाकारण वाहनाने शहरात फिरणाऱ्या वाहन धारकावर कार्यवाही करण्यात यावी. बाहेर राज्यातून किंवा अन्य जिल्ह्यातून गडचिरोलीत छुप्या मार्गाने किंवा पायी येणाऱ्या नागरिकांची माहिती घेऊन त्यांना होम कारंटाईन मध्ये ठेवण्यात यावे. तसेच गरजू व गरीब नागरिकांना अन्न धान्याचा पुरवठा करण्यात यावा व रेशन दुकानातून देण्यात येणारे मोफत धान्य त्वरित देण्यात यावे अशा सुचना यावेळी खासदार अशोक नेते यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढून पेट्रोल पंपावर बंधने टाकली आहेत. त्यात 50 ते 100 रुपयाचा पेट्रोल देऊन त्याचा रेकार्ड ठेवायचा आहे. मात्र, हे नियम पंप धारकांना अडचणीचे असल्याने सदर नियम शिथिल करून चंद्रपूर, गोंदिया किंवा महाराष्ट प्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातही पेट्रोल वाटपाची परवानगी देण्यात यावी अशाही सूचना यावेळी अशोक नेते यांनी दिल्या.
 
 
यावेळी खासदार अशोक नेते यांच्या समवेत भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रदेश सदस्य बाबूरावजी कोहळे, मोरेश्वर बोरकर, उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी भागडे व अन्य अधिकारी उपस्थित होते.