कोठारी ग्रामपंचायतच्या वतीने केले सॅनिटायझरचे वाटप

    दिनांक :25-Apr-2020
|

sanitizer _1  H 
 
 
मुलचेरा,
महाराष्ट्र ग्राम सामजिक परीवर्तन अभियानात समाविष्ट कोपरअल्ली गावात ग्रामपंचायत कोठारी च्या वतीने सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. संपूर्ण जग सध्या कोरोना विषाणूच्या विळख्यात सापडले आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी शासकीय स्तरावर तसेच वैयक्तिक स्तरावर सर्वजण प्रयत्न करत आहेत. यासाठी प्रतिबंधात्मक उपाय lockdown, Social Distancing याबरोबरच सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वच्छता यावर खूप भर दिला जात आहे.
 
 
यापूर्वी 2 वेळा ग्रामपंचायत कोठारी च्या वतीने गावामध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात होती.आणि आता प्रत्येक कुटुंबाला सॅनिटायझर सुद्धा वाटप करण्यात आले. सॅनिटायझर कसे वापरावे आणि हे वापरल्या तर काय दक्षता घ्यावी या संदर्भात माहिती सुद्धा प्रत्येक व्यक्तीला देण्यात आली जेणेकरून याचा वापर करताना कोणते प्रकारचे नुकसान होणार नाही. यासाठी ग्रामपंचायत च्या वतीने पुढाकार घेऊन पूर्ण ग्रामपंचायतील सहा गावातील कुटुंबांना हे सॅनिटायझर मोफत वाटप करण्यात येत आहे.
 
 
आपल्या ग्रामपंचायत मधील नागरिक गरीब आहेत त्यांना lockdown मुळे सर्व कुटुंब घरी असल्यामुळे परवडणारा नाही त्यामुळे ग्रामपंचायतीने हा विचार करून सर्वांना उपसण्याचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.हे काम करण्यासाठी ग्रामपंचायतचे उपसरपंच मनोज भाऊ बंडावार सदस्य रविभाऊ झाडे, ग्रामपरिवर्तक दिलीप शिखरे व कर्मचारी प्रकाश फापणवाडे ग्रामसेवक श्री.डी.एक एम राऊत आदींनी परिश्रम घेतले.