वाशिममधील 10 हजार गरीब परिवारांना जीवनावश्यक किटचे वितरण

    दिनांक :25-Apr-2020
|

bhavna gavli _1 &nbs 
 
 
वाशीम, 
कोरोना महामारीमुळे सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमिवर शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पुढाकारातून व शिवसैनिकांच्या सहकार्यातून जिल्ह्यातील तब्बल 10 हजार गोरगरीब कुटुंबांना धान्य व किराणा किटचे वितरण करण्यात आले. हा सामाजीक उपक्रम 25 एप्रिल रोजी मानोरा, कारंजा, मंगरूळनाथ, मालेगाव, रिसोड या तालुक्यात शिवसैनिकांच्या परिश्रमातून घरोघरी सामाजीक अंतर ठेवून राबविण्यात आला. खासदार गवळी यांच्या मदतीमुळे लॉकडाऊन काळात गोरगरीबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 
 
जिल्ह्यात 24 मार्चपासून येत्या 3 मे पर्यत सातत्याने लॉकडाऊन सुरु असल्याने हातावर कमावून पोट भरणार्‍या अनेक मजुरदार, श्रमिक कुटुंबांची मोठी उपासमार होत आहे. कामधंदे ठप्प पडल्यामुळे पैशाची आवक नाही त्यामुळे जगावे कसे हाच प्रश्‍न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. ही बाब लक्षात घेवून शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या पुढाकारातुन व शिवसेना पदाधिकारी, जिप, नप सदस्य आदींच्या सहकार्यातून गोरगरीब, निराधार, श्रमिक व कामगार कुटुंबांना मदत पोहचविण्यात आली. गवळी यांच्या वतीने यापुर्वी जिल्ह्यातील दोन हजार कुटुंबांना किराणा किटचे वितरण करण्यात आले होते.
 
 
स्थानिक जनशिक्षण संस्थान येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात 25 एप्रिल रोजी खासदार भावना गवळी यांनी धान्य व किराणा किटचे वाटप करण्यात येणार्‍या वाहनांची पाहणी करुन वाहनांना रवाना केले. त्यानंतर जिल्ह्यातील मानोरा, कारंजा, मंगरूळनाथ, मालेगाव, रिसोड आदी लॉकडाऊन प्रभावित भागातील गोरगरीब, गरजु, निराधार, कामगार कुटुंबांना शिवसैनिकांच्या हस्ते घरोघरी जावून व सामाजीक अंतराचे भान ठेवून मदतीचे वाटप करण्यात आले. मिळालेल्या या मदतीमुळे गोरगरीबांच्या चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता.