वरोड्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

    दिनांक :25-Apr-2020
|

Harassment of a minor gir 
 
वरोडा,
आपल्या नातेवाईकांकडे अंत्यविधी करिता आलेली एक अल्पवयीन मुलगी चॉकलेट घेण्याकरता शहरातील एका मेडिकल स्टोअर मध्ये गेली असता मेडिकलच्या मालकाने तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारला उघडकीस आली.
 
सविस्तर वृत्त असे की ,वरोडा शहरातील शहीद डाहुले चौकात रत्नाकर बोधले यांचे मेडिकल स्टोअर्स आहे .15 एप्रिल ला 12 वर्षीय शाळकरी मुलगी आपल्या नातेवाईकांसह वरोडा शहरात एका अंत्यविधी करता आली होती. दुपारच्या वेळेस ती बोथले यांच्या मेडिकल मध्ये चॉकलेट आणायला गेली. लॉक डाऊन, दुपारची वेळ आणि रस्त्यावरील शांतता याचा फायदा घेत मेडिकलचा संचालक रत्नाकर बोथले याने सदर मुलीला फार्मसीच्या मागच्या खोलीत दवाखाना दाखविण्याच्या निमित्ताने नेले आणि तिचा विनयभंग केला असल्याचे पिडीतीने सांगितले.
 
मेडिकल संचालकाचा हा प्रकार पाहून मुलीने त्या ठिकाणी असलेली पाण्याची बाटली त्याला फेकून मारत स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. घरी आल्यानंतर तिने घडलेली आपबिती नातेवाईकांना सांगितली. सदर मुलगी बाहेर गावाला राहत असल्याने तिच्या पालकांनी शुक्रवारी वरोडा पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपी रत्नाकर भोसले याच्या विरुद्ध कलम 354 अ आणि बाल लैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक जाधव यांना विचारले असता आरोपी फरार असल्याचे त्यांनी सांगितले.